शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

खरपुडीच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : खेड तालुक्यातील खरपुडी गावाचे सरपंच विशाल अशोक काशीद यांच्यावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील खरपुडी गावाचे सरपंच विशाल अशोक काशीद यांच्यावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मोटारीची काच फोडून त्यांच्यावर पिस्तूल रोखले. मात्र, सरपंच काशीद यांनी चारचाकी जोरात चालविल्यामुळे ते बालंबाल बचावले. या घटनेने खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री घडली. याप्रकरणी चाैघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खरपुडीचे सरपंच विशाल काशीद व त्यांचा मित्र हे गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात होते. खेड-कनेरसर मार्गावरून ते खरपुडी गावालगत कच्च्या रस्त्यावरून चारचाकीत घरी जात असताना दोन दुचाकीवरून चार व्यक्तींनी येऊन सरपंच काशीद यांच्या चारचाकीला दुचाकी आडव्या लावल्या. चौघांनी तोंडाला रुमाल बांधले असल्यामुळे ते कोण होते हे सरपंच काशीद यांना ओळखू आले नाही. दरम्यान, एकाने लाकडी दांडक्याने गाडीची काच फोडण्याच्या प्रयत्न केला. तो असफल झाल्यानंतर दगडाने काच फोडली. ‘तुला लई माज आला आहे, तुझा माज जिरवितो’ असे म्हणून पिस्तूल काढून सरपंच काशीद यांच्यावर रोखले. प्रसंगाधाव राखत सरपंच काशीद यांनी चारचाकी जोरात चालविल्यामुळे या घटनेतून ते बालंबाल बचावले. या घटनेबाबत सरपंच काशीद यांनी चार जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खरपुडी गावात लाखो रुपयांची विकासकामे सुरू आहेत. हे विरोधकांना पाहवत नसल्यामुळे राजकीय द्वेषातून माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याचे सरपंच काशीद यांनी सांगितले.