शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

हस्तलिखित सातबारासाठी हवी मुदतवाढ

By admin | Updated: June 1, 2016 00:52 IST

शेतकऱ्यांना पीक कर्जांचे वाटप करण्याचे काम ३१ जुलैपर्यंत सुरू असते, त्यामुळे हस्तलिखित सातबारा देण्यासाठीदेखील ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ द्यावी

पुणे : शेतकऱ्यांना पीक कर्जांचे वाटप करण्याचे काम ३१ जुलैपर्यंत सुरू असते, त्यामुळे हस्तलिखित सातबारा देण्यासाठीदेखील ३१ जुलैपर्यंत मुदत वाढ द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.सर्व्हरचा स्पीड, नवीन लॅपटॉप व प्रिंटर पुरविणे, एम.पी.एल.एस चे कनेक्शन देणे, सॉफ्टवेअरमधील दुरुस्त्या तातडीने करणे आदी मागण्या सातत्याने करून देखील शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे आॅनलाईन सातबारा व संगणकीकृत कामांमध्ये प्रचंड अडथळा येत आहे. सन २०१६-१७ च्या सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांना पिककर्ज घ्यावे लागते. आॅनलाईन सातबाऱ्यामध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील चुकांमुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आॅन लाईन सातबारा प्रक्रियेत येणाऱ्या सर्व चुका त्वरीत दुरुस्त करण्याच्या व हस्तलिखित सातबारा देण्याची मागणी तलाठी संघटनांनी शासनाकडे केली होती. तलाठ्यांची ही मागणी लक्षात घेऊन शासनाने हस्तलिखित सातबारा देण्यास अखेर परवानगी दिली. तसेच आॅन लाईन सातबारा दुरुस्तीसाठी एडिट आॅप्शन देऊन तलाठ्यांचे काम सुकर केले आहे. आता प्रत्येक गावासाठी संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये केलेल्या तात्पुरत्या दुरुस्त्यांची सूची योग्य व वस्तुस्थितीप्रमाणे असल्याची खात्री तलाठ्यांने करायची आहे. त्यावर मंडळ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी राहील. त्यानंतरच फेरफारसाठी सदर प्रकरण तहसीलदारांकडे पाठवले जाईल. तहसीलदारांच्या आदेशाने संगणकीकृत सातबाऱ्यावर फेर नोंद नोंदविला जाईल. मंडळ अधिकारी डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून तो प्रमाणित करेल. या सर्व प्रणालीवर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील. त्यासाठी संगणकीकृत सातबारा हा हस्तलिखित सातबाऱ्यांशी तंतोतंत जुळेल, हे ३० जूनपर्यंत सुनिश्चित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. (प्रतिनिधी)