शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

२७ सप्टेंबरची डेडलाईन

By admin | Updated: September 13, 2014 05:20 IST

अगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना २७ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची संधी आहे. या तारखेपर्यंत नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांचे नाव आगामी निवडणुकीतील मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल

पुणे : अगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना २७ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची संधी आहे. या तारखेपर्यंत नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांचे नाव आगामी निवडणुकीतील मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. या शिवाय नागरिकांनी मतदार यादीत नाव असल्याची खात्री करावी तसेच नाव नसल्यास तत्काळ नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राव यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकर उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर आहे. यापूर्वी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधी मतदार नोंदणी अर्ज भरल्यास त्या व्यक्तीस आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र आयोगाने नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज भरण्याची सूचना केली आहे. राव म्हणाले, नामनिर्देशन अर्ज भरल्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत अर्ज करणाऱ्या व्यक्तींची नावे मतदार यादीत असतील याची काळजी घेण्यात येईल. तसेच गेल्या निवडणुकीत मतदान केले म्हणून यादीत नाव असेल म्हणून निर्धास्त न राहता याबाबत खात्री करावी. गेल्या काही महिन्यांत शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातून २ लाख ६४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. अद्यापही ज्यांनी मतदारयादीत नाव समाविष्ट केले नाही, त्यांनी तातडीने कागदपत्रे व अर्ज संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे आवाहन राव यांनी केले. (प्रतिनिधी)