शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थांना डीसी रुल पावणार

By admin | Updated: November 15, 2015 01:20 IST

शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विकास नियंत्रक व प्रोत्साहन नियमावलीमध्ये (डीसी रुल) शैक्षणिक संस्थांना अडीच एफएसआयपर्यंत बांधकाम करण्यास परवानगी

पुणे : शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या विकास नियंत्रक व प्रोत्साहन नियमावलीमध्ये (डीसी रुल) शैक्षणिक संस्थांना अडीच एफएसआयपर्यंत बांधकाम करण्यास परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून त्यास मान्यता मिळाली तर शहरातील जुन्या शैक्षणिक संस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीप्रमाणे शैक्षणिक संस्थांना केवळ एक एफएसआयपर्यंत बांधकाम करता येते. त्यामुळे अनेक संस्थांना जागेचा तुटवडा जाणवत आहे. शहरी भागात नवीन जागा विकत घेणे शक्य होत नाही. महापालिकेने पेड एफएसआय देऊ नये. मात्र, वाढीव एफएसआयसाठी मर्यादीत शुल्क आकारले गेले तर पालिकेलाही उत्पन्नाचे साधन मिळणार आहे, अशा प्रतिक्रिया शहरातील नामांंकित शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. तसेच डीसी रुलमधील प्रस्तावित तरतुदीचे स्वागत केले.जागेच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना नवीन जागा खरेदी करणे अवघड झाले आहे. डीसी रुलमध्ये बदल करून शैक्षणिक संस्थांना अडीच एफएसआयपर्यंत बांधकामास मंजूरी दिली. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, नवीन मराठी शाळा येथे बांधकाम करण्यास फायदा होईल. मात्र,शिक्षण संस्थांना पेड एफएसआय दिल्यास त्याचा परिणाम शैक्षणिक शुल्कवाढीवर होऊ शकतो.- विकास काकतकर, उपाध्यक्ष, नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थांमध्ये आता नवीन बांधकाम करणे शक्य होत नाही. शिवाजीनगर येथील मॉर्डन कॉलेजमध्ये १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जागा अपूरी पडत आहे. एफएसआय वाढवून मिळाला तर शिवाजीनगर व गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयात नवीन संशोधन केंद्र सुरू करता येतील. मात्र, वाढीव एफएसआय देताना त्याचे काही निकष निश्चित करावेत. विद्यार्थी हिताचा विचार करणाऱ्या आणि शासन व विद्यापीठाच्या नियमांचे पालन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांनाच वाढीव एफएसआयचा लाभ द्यावा.- डॉ. गजानन एकबोटे,कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी