शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनादिवशीच ‘शेवंती’ शेतकऱ्यांवर रुसली!

By admin | Updated: November 14, 2015 03:01 IST

नवरात्र उत्सव, दसऱ्याला समाधानकारक भाव मिळाल्याने समाधानी असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवंती फुलांनी नाराजी केली.

भुलेश्वर : नवरात्र उत्सव, दसऱ्याला समाधानकारक भाव मिळाल्याने समाधानी असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेवंती फुलांनी नाराजी केली. आदल्या दिवशी किलोला ७0 ते १00 रूपयांपर्यंत असलेला भाव २0 ते ३0 रूपये मिळाल्याने जिल्ह्यातील फुलउत्पादकांमध्ये नाराजी आहे.गेले दोन महिने फूलबाजारात राजा शेवंती ही फुले अधिराज्य गाजवत होते. पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र भुलेश्वर मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी राजा शेवंतीची लागवड केली होती. येथील हवामान, हलक्या प्रतीची पोषक जमीन, जेमतेम पाणी, या कारणांमुळे येथील राजा शेवंती फुले पुणे, मुंबई, नगर, इत्यादी बाजारपेठेत येथील फुलांना मोठी मागणी असते.फुलांची तोडणी सहा महिन्यांत येते. काही शेतकऱ्यांची फुले तर ऐन बैलपोळा या उत्साहादिवशी बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्यात आली. त्यास बाजारभावही मिळाला. नवरात्र उत्सव, दसऱ्या दिवशी समाधानकारक बाजारभाव मिळाला. दीपावली सणाच्या काळात मात्र असा बाजारभाव मिळाला नसल्याची खंत राजा शेवंतीचे उत्पादक शेतकरी गणेश मुरलीधर यादव यांनी व्यक्त केली. दीपावलीच्या सणामध्ये महत्त्वाच्या लक्ष्मीपूजना दिवशीच राजा शेवंती फुलांचे बाजारभाव पूर्णत: कोसळले. फुले दहा रुपयांपासून तीस रुपयांपर्यंत विकावी लागली. यामुळे फूल उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करत होते.