पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला प्रकल्पांमधील धरणाने तळ गाठला आहे. या धरणांमध्ये अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने उपलब्ध पाणी आणखी काही दिवस राखीव ठेवण्यासाठी, तसेच शहराची पाणीकपात वाढविण्याबाबत पालिका पदाधिकारी तसेच जिल्हा प्रशासन व पाणीपुरवठा अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका आज होणार आहेत. या बैठकीत पाणीकपात वाढवून दिवसाआड पाणी द्यायचे की आणखी काही दिवस पावसाची वाट पाहून आहे तीच कपात कायम ठेवायची, हा निर्णय घेण्यात येईल. सध्या या चारही धरणांमध्ये अवघा 4 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
राज्यात मॉन्सून दाखल होऊन महिना उलटला, तरी पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील धरणांसह शहराला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला, पानशेत वरसगाव, टेमघर या चारही धरणांमधील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, धरणात 1क् ऑगस्टर्पयत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात 28 जूनपासून महापालिकेने 12 टक्के पाणीकपात लागू केली असून, एक वेळ पाणी देण्यात येत आहे. दरम्यान, 1क् जुलैपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याचे सूतोवाच हवामान खात्याने केल्याने या पाणीकपातीचा आढावा 11 जुलै रोजी घेण्यात येणार होता. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पालिका अधिकारी व पाटबंधारे विभागाची बैठक बोलावली असून, या बैठकीत पाणीकपातीचा आढावा घेण्यात येईल. तसेच, उपलब्ध पाणीसाठा आणखी काही दिवस शिल्लक ठेवण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा शक्य आहे का, याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती सूत्रंनी दिली. (प्रतिनिधी)
महापौरही घेणार आढावा
शहरातील पाणीकपातीचा आढावा घेण्यासाठी महापौर चंचला कोद्रे यांनीही उद्या दुपारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाण्याची सद्य:स्थिती तसेच कपातीबाबत पालिका प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार असून, पुढील नियोजनाचा तसेच लागू करण्यात आलेल्या पाणीकपातीचा आढावा घेण्यात येईल, असे कोद्रे यांनी सांगितले.
धरणातील पाण्याची सद्य:स्थिती
धरण उपलब्ध पाणीसाठा (टीएमसी )
खडकवासला0 0. 70
टेमघर 00.00
पानशेत 00.49
वरसगाव 00.00