शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार ठरला अपघाताचा दिवस

By admin | Updated: February 12, 2015 02:31 IST

देहूरोड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर ७ जण जखमी झाले. एका अपघातातील दोन जण तर दुसऱ्या

देहूरोड : देहूरोड येथे दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर ७ जण जखमी झाले. एका अपघातातील दोन जण तर दुसऱ्या अपघातातील एकजण गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर निगडी आणि देहूरोड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत अलकापुरीजवळ सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झालातर कॅन्टोन्मेंट जकात नाक्याजवळ दुपारी पावणेतीनच्या सुमारास दुसरा अपघात झाला.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलकापुरी जवळील अपघातात कार्तिक बाळकृष्ण नाडर (वय १९, रा. बापदेवनगर, किवळे) हा तरूण ठार झाला. त्याच्या समवेत दुचाकीवर असलेले हर्ष राजेंद्र प्रसादसिंग (वय १९, रा. बापदेवनगर, किवळे) आणि कृष्णदेव पतोडी (वय १८, रा. बापदेवनगर, किवळे) हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले. पुणे बाजुकडे निघालेला ट्रेलर (एचआर ५५ एच ४३६७) आणि दुचाकी (एमएच १४ एजे ३६६१) यांच्यात हा अपघात झाला. हर्ष, कृष्णदेव आणि कार्तिक हे तिघे मित्र देहूरोडहून पुणे बाजुकडे निघाले होते. महामार्ग दोन पदरी असतानाही ट्रेलरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज तपासी अंमलदार विनोद शिंदे यांनी वर्तविला.अपघातानंतर ट्रेलर चालक घाबरून पळून गेला. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघात स्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकी ट्रेलर खाली गेल्याने अपघाताची भिषणता तीव्र होती. अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचविले. मात्र, जखमींपैकी कार्तिक या जबद जखमीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.दुचाकीचा चुराडा झाला. तर ट्रेलर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कार्यकर्ते विलास शिंदे, राजू पवार यांनी अपघाताबाबत कळविले.(वार्ताहर)