शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाची भ्रांत अन् उपासमारीचे चटके

By admin | Updated: October 2, 2016 05:28 IST

‘आम्हाला खूप भूक लागते हो; पण दिवसभर उपाशीपोटीच राहावे लागते..’ ही खंत आहे शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींची. सकाळच्या वेळी नाश्ता दिल्यानंतर थेट सायंकाळी

- प्रवीण गायकवाड, शिरूर

‘आम्हाला खूप भूक लागते हो; पण दिवसभर उपाशीपोटीच राहावे लागते..’ ही खंत आहे शासकीय मुलींच्या वरिष्ठ बालगृहातील मुलींची. सकाळच्या वेळी नाश्ता दिल्यानंतर थेट सायंकाळी सातला जेवण मिळत असल्याने या मुलींना उपाशीपोटी राहावे लागत आहे. आधीच समस्यांनी वेढलेल्या या बालगृहात जेवणाचीही भ्रांत आणि उपासमारीचे चटके सहन करीत पोटाला पीळ देत या मुलींना जगावे लागत आहे. बालगृहामध्ये असणाऱ्या मुलींना सकाळी पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर त्यांना थेट संध्याकाळी सातला जेवण मिळते. मर्यादित जेवण मिळाल्याने त्यांना दिवसभरात व रात्री पुन्हा भूक लागते. मात्र, कुणाकडेच बोलण्याची सोय नाही. त्यामुळे त्यांना भूक मारून मुकाट्याने जगावे लागत आहे. यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिवांनी भेट दिल्यानंतर मुलींनी ही खंत त्यांच्यासमोर व्यक्त केली, तेव्हा ही बाब समोर आली. समस्यांनी भरलेल्या या बालगृहात सध्या केवळ १२ मुली आहेत. यातील ज्या मुली सातवीपर्यंत आहेत, त्यांना शाळेत शालेय पोषण आहार मिळतो; मात्र दहावीत असणाऱ्या ४ मुलींना शालेय पोषण आहार मिळत नाही. मर्यादित नाश्ता करून मुली सकाळी अर्धपोटी शाळेत जातात. सुधारणा न झाल्यास आंदोलन मुलींची ही व्यथा व पोटभर अन्न मिळत नसल्याची व्यथा ऐकून गवारी यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. बालगृहात मुलींना पोटभर अन्नही मिळत नसेल, यावर त्यांचा विश्वासही बसला नाही. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या वयात (१५ वर्षे) मुलींना सकस आहाराची आवश्यकता असते, त्याच वयात त्यांना उपाशी ठेवले जात आहे ही शरमेची बाब म्हणावी लागेल. इतर मुलींचीही अशीच हेळसांड सुरू असून, विविध समस्यांच्या गर्तेत या मुली जगत आहेत. मात्र, दया येईल तो महिला व बाल कल्याण विभाग कसला? अतिशय संताप आणणारी ही बाब असून त्यात सुधारणा झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा गवारी यांनी दिला आहे. मुलींनी व्यक्त केली खंतदिवसभर आम्हाला खूप भूक लागते हो; मात्र नाइलाजास्तव तसेच शाळेत बसावे लागते. संध्याकाळी सात वाजता जेवण दिले जाते; पण रात्री पुन्हा भूक लागते.