शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दांडीया, गरबाचे महिला घेताहेत धडे, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रतिसाद

By admin | Updated: September 30, 2016 23:05 IST

नवरात्री म्हटले की शहरात ठिकठिकाणी दांडीया आणि गरबा यांच्या कार्यक्रमाला उधाण येते. एका विशिष्ट वर्गाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकाराचा आनंद घेण्यासाठी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३३ : नवरात्री म्हटले की शहरात ठिकठिकाणी दांडीया आणि गरबा यांच्या कार्यक्रमाला उधाण येते. एका विशिष्ट वर्गाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकाराचा आनंद घेण्यासाठी समाजातील सर्वच जाती-धर्माच्या तरुणांबरोबरच मध्यमवयीनांचीही मोठी पसंती असल्याचे दिसते. नवरात्रीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकाराचे धडे घेण्यालाही महिला तसेच पुरुष वर्ग प्रशिक्षणासाठी गर्दी करत असल्याचे दिसते. शहरातील विविध मंगल कार्यालये, लॉन्स नवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या या दांडिया व गरबाच्या कार्यक्रमांनी फुल्ल झाले आहेत. अनेक जण हे प्रशिक्षण शुल्क भरुन घेत आहेत तर काही समाजाच्या संस्था किंवा इतर संस्थांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अनेक सोसायट्या किंवा घरगुती स्तरावरही हे महिला आणि तरुणी हे दांडीयाचे धडे घेत असल्याचे शहरात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. या खेळांतून भारतीय परंपरा जपली जात असून महिलांमध्ये या प्रशिक्षणासाठी मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहिती देताना पूना लोहाणा महाजन संस्थेच्या कार्यकारणी सदस्य कृती नागरेचा म्हणाल्या, समाजातर्फे मागील अनेक वर्षांपासून मोफत दांडिया आणि गरब्याचे प्रशिक्षण देत आहोत. नवरात्रीच्या काळात ठिकठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये समाजातील मुलींना सहभागी होता होऊन बक्षिसास पात्र होता यावे यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येते. सध्या व्यावसायिक प्रशिक्षक एका महिन्याच्या १२ ते १६ जणांना प्रशिक्षण देण्यासाठी १८ ते २० हजार रुपये आकारण्यात येतात. यातही महिन्यातून केवळ ५ ते ६ वेळा हे प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय नवरात्रादरम्यान ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या सामुहीक दांडीया कार्यक्रमांसाठीही प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये शुल्क आकारण्यात येते असेही त्या म्हणाल्या. दरवर्षी दांडीया आणि गरबा याच्या स्टेप्समध्ये नव्याने भर पडत असल्याने या स्टेप्स समाजातील मुलींना माहीत व्हाव्यात आणि त्या या कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये यशस्वी व्हाव्यात हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश असतो.