शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

धरणं तुडुंब

By admin | Updated: August 5, 2014 23:09 IST

15 जुलैपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाण्याचा बॅकलॉग भरून काढला आहे. यंदा धरणं 50 टक्के तरी भरतील का ?

15 जुलैपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाण्याचा बॅकलॉग भरून काढला आहे. यंदा धरणं 50 टक्के तरी भरतील का ? अशी चिंता असताना आता सर्वच धरणांत 70 टक्केच्या वर पाणीसाठा झाला आहे. 25 धरणांपैकी 4 ते 5 धरणं 100 टक्के भरली असून, सहा धरणं 85 ते 95 टक्केर्पयत भरली आहेत. 10 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, मुळशीतून सर्वाधिक 30 हजार क्युसक्सने पाणी सोडले जात आहे. उजनी धरण प्लसमध्ये आले असून 18 टक्के पाणीसाठा झाला आहे.
 
नीरा नदीला दुस:या दिवशीही पूर
पुरंदरमधील वीर धरणाचे आज मंगळवारी मध्यरात्नी 5 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्नात प्रतिसेकंद 23 हजार क्युसेक्सपेक्षा अधिक प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूकरण्यात आला. परिणामी आज दुस:या दिवशीदेखील नीरा नदीपात्नातील पूरस्थिती दुपार्पयत वाढली होती. वीर धरण पाणलोट क्षेत्नात अल्पप्रमाणावर केवळ 25क् मि.मी. आजअखेर पाऊस झाला असला तरी वीर धरणामध्ये सध्या 1क्क् टक्के म्हणजे 9 हजार 835 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, नीरा नदीच्या पूरस्थितीमुळे नीरा नदीकाठच्या गावांना जलसंपदा आणि महसूल विभागाच्या प्रशासनाने  इशारा दिला आहे.  / वृत्त पान 8
 
कुकडीत 67.68 टक्के साठा
कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये आज (मंगळवारी) दुपारी 2 वाजेर्पयत येडगाव धरण 94.23 टक्के, तर वडज धरण 93.31 टक्के भरले आह़े  या दोन्ही धरणांमधून अतिरिक्त अडीच टीएमसी पावसाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सोडण्यात येत आह़े  उपयुक्त पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली असून, सर्व धरणांमध्ये सरासरी 67.68 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आह़े, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ 1  चे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांनी दिली़ पाचही धरणांमध्ये 2क्666 द.ल.घ.फू उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. गतवर्षी या दिवसाअखेर 23491 द.ल.घ.फू (76.93 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.  / वृत्त पान 8
 
पावसाळ्यातही टँकरने पाणी : 
पावसाने ओढ दिल्याने जून महिन्यात पुणो विभागातील 39क् गावांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत होती. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विभागातील  48 गावे टँकरमुक्त झाली आहेत. मात्र अजूनही  342 गावांतील 1 हजार 535 वाडय़ावस्तीतील  7 लाख 71 हजार  366 नागरिकांना 348 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. पुणो जिल्ह्यातील 56 गावांतील 481 वाडी-वस्तीवरील 1 लाख 6क् हजार 589 नागरिकांना 9क् टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
 
उजनीचा पाणीसाठा 1क्.91 टीएमसी
इंदापूर : उजनी धरणात दौंड, बंडगार्डन, मुळशी धरण, खडकवासला, चासकमान येथून पाणी येत असल्याने पाण्याची पातळी जलद गतीने वाढू लागली आहे. आज (दि. 5) सायंकाळी सहा वाजेर्पयत उजनीचा उपयुक्त पाणीसाठा 1क्.91 टीएमसीर्पयत पोहोचला आहे.
पाणी पातळी 492.क्49 मीटर र्पयत पोहोचली आहे. एकूण पाणीसाठी 74.57 टीएमसी झाला आहे. दौंडहून 83 हजार 984 क्युसेक्स, बंडगार्डनहून 64 हजार 691 क्युसेक्स, मुळशी धरणातून 1 हजार क्युसेक्स, खडकवासला धरणातून 3 हजार 264 क्युसेक्स, चास कमान येथून 3 हजार 3क्8 क्युसेक्स क्षमतेने उजनी धरणात पाणी येत आहे. 3 ऑगस्टला उजनीतील उपयुक्त पाणीसाठा वजा 4 टीएमसी होता. काल संध्याकाळी तो बेरजेत आला.
सध्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रतील वाढविण्यात आलेला पाईपलाईन काढून घेण्याची शेतक:यांची धांदल सुरू झाली आहे. वरून पाणी सोडल्याने ‘देर से ही सही, पर अच्छे दिन आये है’ अशी शेतक:यांची स्थिती झाली आहे.