शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दुबार मतदारांवर संक्रांत

By admin | Updated: January 12, 2017 02:25 IST

महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य

पुणे : महापालिका व जिल्हा परिषद दोन्ही ठिकाणी मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल साडेसहा लाख दुबार मतदारांना राज्य निवडणूक आयोगाने चांगलाच लगाम घातला आहे. या वेळी प्रथमच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी एकाच दिवशी २३ फेबु्रवारी मतदान होणार असल्याने या दुबार मतदारांना जिल्हा परिषद अथवा महापालिका एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातही मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांची संख्या खूप मोठी आहे. यातील अनेक मतदारांची नावे राजकीय सोयीसाठी दोन्ही ठिकाणी नोंदविण्यात आली आहेत. शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे निवडणूक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेनुसार मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यातील दुबार नावे मोठ्या प्रमाणात कोथरूड, सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज परिसरात आहेत. पुरंदर आणि दौंडमधील नावांचा समावेश हडपसर आणि कोंढवा परिसरात आहेत. वडगाव शेरी, खराडी, चंदननगरमध्ये मोठ्या प्रमाणात शिरुर आणि हवेली तालुक्यातील मतदारांची दुबार नावे आहेत. जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यातील मतदार भोसरी, पिंपरी-चिंचवड परिसरात आढळून येतात. निवडणूक कार्यालयाच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या पाहाणीमध्ये जिल्ह्यात तब्बल साडे सहा लाख मतदार दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने आजही मतदार यादीत ही नावे कायम आहेत. जिल्ह्यात आता पर्यंत नेहमी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या मतदानाच्या तारखामध्ये किमान १० ते १५ दिवसांचे अंतर होते. त्यामुळे दुबार नाव असणारे अनेक मतदार नेहमीच दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याचा अनुभव आहे. परंतु दुबार मतदारांच्या दोन्ही ठिकाणी मतदान करण्याला निवडणूक आयोगाने चांगला लगाम लावला आहे. शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी नाव असलेल्यांची संख्या लाखांच्या घरात असल्याचे निवडणूक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.