शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांचे मीटर रीडिंग

By admin | Updated: February 15, 2017 01:29 IST

राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा मिळावी. यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी ‘महावितरण’च्या वतीने तयार करण्यात

बारामती : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा मिळावी. यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी ‘महावितरण’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ सात महिन्यांत सुमारे १० लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. तसेच, ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला आहे. सुमारे ४५ हजार ८१५ ग्राहकांना अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा, वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही, त्यांना अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र अ‍ॅप’ डाऊनलोड केले आहे. याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीजमीटर रीडिंग, फिडर व डीटीसी मीटर रीडिंग इत्यादी कामे प्रभावीपणे केली जात आहेत. सुमारे १ कोटी ४ लाख ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोदणी ‘महावितरण’कडे केली आहे. मीटर रीडिंग, वीजबिल, आॅनलाईन बिल, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज व त्याची सद्य:स्थिती, मीटर वाचन घेतल्याचा व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे आदीबाबतच्या सूचना एसएमएसद्वारे पाठवित आहेत.