शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव हद्दीच्या विकास आराखड्याबाबत उत्सुकता

By admin | Updated: August 20, 2016 05:15 IST

बारामती नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्यावर नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर शासकीय समितीने सुनावणी घेतली होती. या समितीचा अहवाल नगरपालिकेला

बारामती : बारामती नगरपालिकेच्या वाढीव हद्दीतील विकास आराखड्यावर नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर शासकीय समितीने सुनावणी घेतली होती. या समितीचा अहवाल नगरपालिकेला प्राप्त झाला आहे. हा अहवाल शनिवारी (दि. २० आॅगस्ट) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. त्यामुळे हरकतदारांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली की नाही, याबाबतची उत्सुकता लागली आहे. हा विकास आराखडा चुकीचा झाला आहे, असा मुद्दा उपस्थित करून अनेक मिळकतधारकांनी हरकती घेतल्या होत्या. या हरकतींवर शासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीमध्ये बारामती नगरपालिकेच्या तिघा नगरसेवकांचा समावेश होता. जवळपास आठ दिवस सुनावणी सुरू होती. काही मिळकतधारकांनी नामवंत वकील अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांच्या मार्फत सुनावणीसाठी उपस्थिती दर्शविली होती. रेखांकने मंजूर असताना शाळा, इमारतींवर पार्किंगचे आरक्षण, नगरसेवकांच्या लाभासाठी शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर रस्त्यांचे आरक्षण तसेच रस्त्यांचे रुंदीकरण, हद्दीबाहेरच्या मिळकतींवर आरक्षण टाकण्यात आले होते. आराखड्यावर हरकत घेताना अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांनी आराखड्यात अनेक चुका आहेत. त्यामुळे तो रद्द करून पुन्हा सक्षम अधिकाऱ्याकडून तयार करावा. नगररचना कायद्याची पायमल्लीही केली आहे. वाढीव हद्दीमुळे बारामतीचे क्षेत्रफळ पाच पट वाढले आहे. त्यानुसार आराखडा करताना नियोजनबद्ध असला पाहिजे. कोणी बाधित होऊ नये, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. संपूर्ण विकास आराखडाच रद्द करावा, प्रारूप विकास आराखडा मंजूर होण्यापूर्वीच रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. कामे मनमानी पद्धतीने झाली. त्यामुळे आराखडादेखील बाधित होतो, अशी हरकत घेतली होती. (प्रतिनिधी)