शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या वाहनांसाठी गर्दी

By admin | Updated: March 31, 2017 03:23 IST

सर्वोच्च न्यायालयाने वायुप्रदूषण मानांकनाची पूर्तता न करणाऱ्या बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर एक एप्रिलपासून

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने वायुप्रदूषण मानांकनाची पूर्तता न करणाऱ्या बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घातली आहे. देशभरातील विविध शोरूम आणि कंपन्यांच्या गोदामांत अशी तब्बल ८ लाख दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने असून, त्यांची किंमत या निर्णयामुळे शून्य होणार आहे. विक्रीसाठी शुक्रवारचा (दि. ३१) एकच दिवस असल्याने अनेक कंपन्यांनी दुचाकींवर १० ते २० आणि चार चाकी वाहनांवर जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत सवलत देऊ केली असल्याने शहरातील विविध शोरूममध्ये सवलत जाहीर केलेल्या वाहनांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. सर्वोच्च न्यायालयात याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने वायुप्रदूषणाचे निकष पूर्ण न करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून बीएस-४ या मानकांची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या वाहनांची नोंदणी परिवहन विभागाच्या कार्यालयाने करू नये, असे अदेशात म्हटले आहे. बीएस-३ वाहनांची विक्री जर ३१ मार्चपूर्वी करण्यात आली असेल, तर वाहनविक्रीचा पुरावा सादर करावा लागेल. त्यानंतरच वाहनांची नोंदणी करता येईल. वाहनविक्रीचा पुरावा म्हणून अर्ज-२१, बिल आणि वाहन विमा प्रमाणपत्र, तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्याचे अपर परिवहन आयुक्त एस. बी. सहस्रबुद्धे यांनी काढले आहेत. या निर्णयामुळे विविध वाहन कंपन्यांनी जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी शहरातील विविध वाहनांच्या शोरूममध्ये नागरिकांकडून विचारणा होत होती. त्यामुळे शुक्रवारी वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अनेकांची संधी हुकली गुढी पाडव्यासाठी २५ ते २८ मार्च या कालावधीत ३ हजार २३३ दुचाकी, तर १ हजार ३६ मोटार कारची खरेदी केली. तसेच दोन रुग्णवाहिका, ५ बस, २५ मालवाहतूक ट्रक, ६९ मोटार कॅब, ८ तीन चाकी मालवाहू गाड्या आणि १३ रिक्षांचा समावेश आहे. त्यातील ६०५ वाहनचालकांनी प्रत्यक्ष पाडव्याच्या दिवशी वाहनखरेदी केली. अशा तब्बल ४ हजार ३९१ वाहनांची विक्री या काळात झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे. या खरेदीदारांची अनाहुतपणे मिळालेल्या सवलतीची संधी हुकली आहे. सध्या युरो-४ निकष पूर्ण करणारी ८० टक्के वाहने आहेत. उर्वरित वाहने युरो-३ ची आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रदूषण मानके पूर्ण न करणाऱ्या देशातील ८ लाख वाहनांची १ एप्रिलपासून विक्री करता येणार नाही. - संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी