शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

४ महिन्यांत कोटींचे उड्डाण

By admin | Updated: May 6, 2017 02:33 IST

लोहगाव ग्रामपंचायतीला नव्याने बांधलेल्या घरांच्या नोंदणीतून १ कोटी ८८ लाख ७४ हजार २०९ रुपये मिळाले आहेत. ४ महिन्यांतच

लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : लोहगाव ग्रामपंचायतीला नव्याने बांधलेल्या घरांच्या नोंदणीतून १ कोटी ८८ लाख ७४ हजार २०९ रुपये मिळाले आहेत. ४ महिन्यांतच हे उत्पन्न मिळाले आहे.ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घरांची अनधिकृत बांधकामे व या बांधकामांची ग्रामपंचायत दफ्तरी होत असलेली नोंद यामुळे एकप्रकारे अनधिकृत बांधकांमाना अभय मिळत होते. यामुळे शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झाल्याने अशा ठिकाणी सोयी-सुविधा पुरवणे अवघड बनले होते व ही बाब शासनासाठी डोकेदुखी ठरली होती. अनधिकृत बांधकामांना आळा बसावा, यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींना नवीन घरांच्या नोंदी करण्याचे अधिकारच काढून घेतले होते. मात्र यामुळे घरांचा बांधकाम कर व घरपट्टीतून ग्रामपंचायतींना मिळणारा मोठा निधी बंद झाला. त्यामुळे ग्रामपंचायतींना घरांच्या नोंदी करण्याचे अधिकार पुन्हा  देण्याची मागणी जोर धरू  लागल्याने शासनाने ग्रामपंचायतींना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे अधिकार पुन्हा बहाल केले. ५ हजार घरांची नव्याने नोंदलोहगाव परिसरात झालेली बांधकामे व बांधकाम प्रकल्प अशा एकूण ५८२ मिळकतींची ग्रामपंचायत दफ्तरी मागील ४ महिन्यांत नोंद करण्यात आली आहे. नोंद झालेल्या ५८२ मिळकती असल्या तरी यामध्ये बांधकाम प्रकल्पही आहेत. त्यामुळे या प्रकल्पांतील सदनिकांचा विचार करता प्रत्यक्षात ४ ते ५ हजार घरांची नव्याने नोंद करण्यात आली आहे. या सर्व मिळकतींना जमिनींच्या रेडिरेकनर भांडवली दरानुसार मिळकतकर व नोंदणी शुल्क आकारण्यात येत असल्याने महसुलात वाढ झाल्याचे लोहगावचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढवळे यांनी सांगितले.