शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्यांकडून वाहन, मोबाईलचोरीचे गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST

पुणे : चोरलेल्या गाड्या विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून वाहनचोरीचे ५ तर मोबाईलचोरीचे ...

पुणे : चोरलेल्या गाड्या विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून वाहनचोरीचे ५ तर मोबाईलचोरीचे १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रशांत मधुकर भोसले (वय २०, रा. पालखी मार्ग, उरुळी देवाची), हसन इक्बाल शेख (वय २०, रा. पालखी मार्ग, उरुळी देवाची) आणि अभिषेक विलास पाडुळे (वय २१, रा. उरुळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दरोडा आणि वाहनचोरीविरोधी पथक हडपसर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना दोघे जण जुगाडाच्या दोन गाड्या विकण्याच्या तयारीत आहेत. कोणी विकत घेत असेल तर सांगा, असे विचारत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सासवड रोडवरील काळेपडळ येथे पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आकाश याच्या सोबतीने चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

त्यांच्याकडून हडपसर, कोंढवा, यवत, लोणी काळभोर, अंबोली (मुंबई) या भागांतील वाहनचोरीचे ५ आणि मोबाईलचोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्याकडून आणखी ८ मोबाईल जप्त केले.

पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार बुवा कांबळे, उदय काळभोर, दिनकर लोखंडे, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, अमोल सरतापे, संभाजी गंगावणे यांनी ही कामगिरी केली.