शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिरुरमधील गुन्हेगारी यंत्रणेअभावी वाढतेय!

By admin | Updated: May 27, 2014 07:13 IST

ना कार्यालयाची स्वत:ची इमारत, ना मंजूर पदाएवढे कर्मचारी कार्यान्वित आणि ना अधिकार्‍याचे लक्ष यामुळे शिरूर पोलीस ठाण्यातील गुन्हेदर वाढतानाचे चित्र आहे.

शिरूर : ना कार्यालयाची स्वत:ची इमारत, ना मंजूर पदाएवढे कर्मचारी कार्यान्वित आणि ना अधिकार्‍याचे लक्ष यामुळे शिरूर पोलीस ठाण्यातील गुन्हेदर वाढतानाचे चित्र आहे. वर्षभरात एकही दिवस टाळे नसलेल्या पोलीस ठाण्यात गुन्हेदर कमी करायचा असती तर सक्षम व पूरक यंत्रणा उभी राहणे गरजेचे आहे. ५४ गावे व जवळपास १०० किलोमीटर हद्द समाविष्ट असलेल्या शिरूर पोलीस ठाण्याची सध्याची इमारत ही ब्रिटिशकालीन आहे. या इमारतीची जागा ही महसूल विभागाचीआहे. तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयाच्या मध्यभागी असलेल्या पोलीस ठाण्याच्या इमारतीची सद्य:स्थिती पाहता पोलीस अधिकार्‍याला बसण्यासाठी असलेला स्वतंत्र कक्ष वगळता इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बसण्यास पुरेशी जागाच नाही. या जुन्या इमारतीच्या समोरील जागेत पाच वर्षांपूर्वी एक छोटासा हॉल बांधण्यात आला असून यातच एक सहायक निरीक्षक, २ उपनिरीक्षक, गुन्हे विभागाचे दोन कर्मचारी दाटीवाटीने बसत आहेत. याच हॉलमध्ये महिला दक्षता समितीलाही टेबल स्पेस देण्यात आला आहे. ठाणे अंमलदाराची खोलीही लहान आहे. अशात कामे कशी उरकायची, हा अधिकारी व कर्मचार्‍यांसमोर प्रश्न असतो. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागाची लोकसंख्या सध्या दोन लाखांवर एवढी असेल मात्र पोलीस कर्मचार्‍यांची संख्या इंग्रजांच्या काळात मंजूर संख्येप्रमाणे (कदाचित थोडी वाढ झाली असेल) आहे. या ठाण्यात पाच अधिकारी व ११३ कर्मचारी पदे अनेक वर्षांपासून मंजूर आहेत, मात्र चार अधिकारी व ७९ कर्मचारीच कार्यरत आहेत. न्हावरे, रांजणगाव औद्योगिक वसाहत, मांडवगण फराटा व टाकळीहाजी या ठिकाणी दूरक्षेत्र कार्यालय असून या कार्यालयांमध्ये अनुक्रमे एक अधिकारी, पाच कर्मचारी, एक अधिकारी, आठ कर्मचारी, चार कर्मचारी व एक अधिकारी, सहा कर्मचारी असा स्टाफ आहे. या व्यतिरिक्त बारामती अप्पर अधीक्षक कार्यालयात एक, पुणे ग्रामीण मुख्यालयात एक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात एक, दौंड उपविभागीय कार्यालयात एक, पुणे सत्रन्यायालय १, शिरूर न्यायालयात एक, पुणे ग्रामीण मुख्यालयात व रांजणगाव मंदिरात एक, कोर्ससाठी एक असे आठ कर्मचारी बाहेर असतात. गेल्या काही महिन्यांत मात्र तसे चित्र येथील अधिकार्‍याबाबत दिसत नाही. मनासारखे पोलीस ठाणे न मिळाल्याने या अधिकार्‍याचे या ठाण्यात लक्ष लागत नसून त्यांची या ठाण्यात उपस्थितीही नगण्य आहे. पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकार्‍याने दर शनिवारी पोलीस ठाण्यात उपस्थित असणे बंधनकारक आहे. त्याचेही बहुतांशी या ठाण्यात पालन होताना दिसत नाही. (वार्ताहर)