शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्ध जीवन’सह मोतेवारांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: November 1, 2015 02:37 IST

सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेबीने शनिवारी सायंकाळी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या गुन्ह्यात त्यांच्या सहकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. महेश किसन मोतेवार, वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्यासह समृद्ध जीवन फूड्स कंपनीविरुद्ध भादंवि ४२०, १८८, १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सेबीचे सहायक महाव्यवस्थापक सचिन ए. सोनवणे (रा. सेबी भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी सेबीने कंपनीला गुंतवणूक न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. कंपनीमार्फत ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’द्वारे लोकांकडून आर्थिक गुंतवणूक तसेच ठेवी घेण्यात येत होत्या़ अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते. ही परवानगी समृद्ध जीवनने घेतलेली नव्हती. त्यामुळे गुंतवणूक थांबविण्याचे आदेश सेबीने दिले होते. परंतु, तरीही कंपनीने गुंतवणूक घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीने कंपनीची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कंपनीचे आॅडिट बुक, अकाऊंट बुक ताब्यात घेतले होते. त्यात सेबीने बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांकडून गुंतवणूक घेणे कंपनीने सुरूच ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सेबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे प्रमुख महेश मोतेवार यांनाच या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.(प्रतिनिधी)सेबीने डेक्कन पोलिसांकडे समृद्ध जीवन फूड्स आणि महेश मोतेवार यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेबीने दिलेल्या कागदपत्रांवरून या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. - प्रवीण चौगुले, वरिष्ठ निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे