शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीची दुरवस्था

By admin | Updated: November 11, 2015 01:47 IST

येथील वाढती लोकसंख्या व होणारे प्रदूषण लक्षात घेता हडपसर माळवाडी येथील नादुरूस्त डिझेल दाहिनी तातडीने सुरू करावी व देखभाल नियमित व्हावी

हडपसर : येथील वाढती लोकसंख्या व होणारे प्रदूषण लक्षात घेता हडपसर माळवाडी येथील नादुरूस्त डिझेल दाहिनी तातडीने सुरू करावी व देखभाल नियमित व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारा महापौर व महापालिका आयुक्तांकडे नागरिकांनी केली आहे. शार्टसर्किट झाल्यामुळे हडपसर माळवाडी येथील एकमेव विद्युत दाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. येथील सर्व वायरिंग जळून येथील जुनी कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. डिझेल दाहिनीचा दरवाजा पूर्णपणे जाम झालेला आहे. हडपसरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच माळवाडी येथे एकमेव स्मशानभूमी व डिझेल दाहिनी पुणे महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक चेतन तुपे यांच्या पुढाकारातून विकसित करण्यात आली आहे. या डिझेल दाहिनीचा वापर मोठ्या प्रमाणात नागरिक करतात. वायूचे प्रदूषण व मयतीसाठी लागणारे साहित्य आणि वेळ लक्षात घेता डिझेल दाहिनी अतिशय उपयुक्त असून, हडपसर माळवाडी येथील डिझेल दाहिनीमध्ये शार्टसर्किट झाल्याने दाहिनी बंद अवस्थेत आहे. दाहिनी बंद असल्यापासून सुमारे अनेक मृतदेहांवर लाकडावर अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. डिझेल दाहिनी मोफत असल्याने गोरगरिबांना ती परवडते. पण, नादुरुस्त दाहिनीमुळे नाहक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. महिन्यास ४० ते ४५ मृतदेहासाठी या दाहिनीचा वापर होतो, हे लक्षात घेता तातडीने येथील डिझेल दाहिनी सुरू करावी; तसेच दाहिनीच्या देखभालीसाठी तंत्रज्ञासह यंत्रणा ठेवावी, वेळोवेळी सुरळीत देखभाल व्हावी, अशी मागणी येथील शहीद भगतससिंग ट्रस्टचे अध्यक्ष विजय मोरे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे व आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे लेखी निवेदनद्वारा केली आहे.(वार्ताहर)पारंपरिक पद्धतीने लाकडाचा वापर केल्याने वेळ जास्त लागतो व खर्च वाढत आहे. त्याचबरोबर धरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार डिझेल दाहिनीवर करावेत व होणारे संभाव्य प्रदूषण टाळावे, यासाठी हडपसर-माळवाडी येथील स्मशानभूमीत माहिती फलक लावून जनजागृती केली जात आहे. या फलकांमुळे नागरिकांमध्ये प्रबोधन होऊन दाहिनीच्या वापरात वाढ झाली आहे. तसेच, प्रदूषण टाळण्यासाठी मोठी मदत होत आहे.