पुणे : मावळमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा टॉवेलने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सचिन मोकिंदा गायकवाड (वय ३२, रा. मावळ) असे आरोपीचे नाव आहे.
श्वेता सचिन गायकवाड (वय २६, रा. मावळ) यांनी पती सचिन यांच्याविरूद्ध तळेगाव एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी यांच्या घरी मावळ येथे घडला. आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतो. तसेच या प्रकरणाच्या पुढील तपास बाकी आहे. त्यामुळे जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केला. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
.....