शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

By admin | Updated: May 18, 2017 23:26 IST

देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी यशस्वीरित्या पार पडली. सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले.तब्बल ९ तास ही अत्यंत गुंतागुंतीची  मानली जाणारी ही शस्त्रक्रिया चालली होती.  डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखालील १२ निष्णात डॉक्टरांच्या टीमने हे प्रत्यारोपण यशस्वी केले. 
 
याबाबत डॉ. मिलिंद तेलंग म्हणाले, ‘आदल्या दिवशी रात्री १२ वाजल्यापासून शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. आईच्या शरीरातून गर्भाशय काढण्यासाठी सुमारे ४ तासांचा कालावधी लागला. त्यानंतर गर्भाशय रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. गर्भाशयदाती आणि प्रत्यारोपण करण्यात आलेली रुग्ण सुखरुप आहे. रुग्णाला २४ तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.’
 
या कुटुंबातील चार बहिणींमध्ये या  मुलीला जन्मापासूनच गर्भाशय नव्हते. त्यामुळे आईनेच तिच्यासाठी गर्भाशय देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, भारतामध्ये या शस्त्रक्रियेची सुविधा नव्हती. गॅलक्सी हॉस्पीटलच्या डॉ. पुणतांबेकर यांनी देशातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान घेतले. या मुलीच्या आईचेच गर्भाशय तिच्यामध्ये  प्रत्यारोपित  करण्यात आले. नियमित औषधोपचारांबरोबरच या महिलेची च मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गर्भाशयदातीचा गर्भाशय काढण्यासाठी ४ तास व त्याचे प्रत्यारोपण करण्यासाठी चार तास लागले, अशी माहितीही डॉ. तेलंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
 
गर्भाशय प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया स्वीडनमध्ये २०१४ मध्ये करण्यात आली आहे़ आतापर्यंत जगात केवळ २५ शस्त्रक्रिया झाल्या असून त्यापैकी १० शस्त्रक्रियांनंतर महिला गर्भवती होऊ शकल्या आहेत़ गेल्या १४ वर्षांपासून गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये गर्भाशयाच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया केल्या असून जगातील ४० देशात पुणे टेक्नीक म्हणून हे तंत्रज्ञान ओळखले जाते़ आत्तापर्यंत गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या होत्या. मात्र, तोच गर्भाशय काढून इतर व्यक्तीला कोणतीही चूक न करता नव्याने बसवणे हे दिव्य डॉक्टरांना पार पाडावे लागणार होते. प्रत्यारोपण पार पडल्यानंतर डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. 
 
 
ज्या महिलांना जन्मत:च गर्भाशयाची पिशवी नसते किंवा गर्भाशयाची पिशवी असूनही ती निकामी झालेली असते अथवा कॅन्सरमुळे गर्भाशय काढून टाकण्याची वेळ आलेली असते, अशा महिलांना पुत्रप्राप्तीसाठी गर्भाशय प्रत्यारोपण करण्याचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे़ यामध्ये मुलीला तिच्या आई किंवा बहिणीकडूनच गर्भाशय मिळू शकते़ त्यादृष्टीने दाता आई व मुलीच्या डीएनए स्टेट करुन सर्व कायदेशीर बाबी ससून रुग्णालयामार्फत पूर्ण करण्यात आल्या. 
 
मातृत्वाचा मार्ग होईल मोकळा-
 
जन्मत:च गर्भाशय नसलेल्या किंवा काही कारणामुळे गर्भाशय काढून टाकावे लागणाºया महिलांना मातृत्वाचा आनंद मिळू शकत नाही. परंतु, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्यांच्यासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे. मात्र,आई किंवा बहिणच गर्भाशय दान करून शकते. मात्र,त्यासाठी वयाचे ठराविक बंधन असते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.