शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची ‘टोपी’ आता नगरसेवकांना

By admin | Updated: June 14, 2014 00:03 IST

महापालिकेच्या कार्यक्रमातून गायब झालेल्या फेट्यांची किमत पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार आहे

पुणे : महापालिकेच्या कार्यक्रमातून गायब झालेल्या फेट्यांची किमत पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठीचे लेखी पत्र महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना देण्यात येणार असल्याची माहिती महापौर चंचला कोद्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ही रक्कम ४९ हजार ५०० रुपयांची आहे. ‘फेट्यांनी घातली महापालिकेस टोपी’ या वृत्ताद्वारे लोकमतने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पालिकेने नूतनीकरण केलेल्या या सभागृहाचे उद्घाटन आणि शारदाबाई पवार शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमाचे आयोजन १७ जानेवारी २०१४ रोजी माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार, आमदार, तसेच महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका यांना फेटे बांधण्याची व्यवस्था करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार, सुमारे २०० मान्यवरांना फेटे बांधण्याचे काम एका ठेकेदारास देण्यात आले होते. हे फेटे एका दिवसासाठी फेटा बांधणीसह २५० रुपये या दराप्रमाणे भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ११० मान्यवरांनी हे फेटे परत केले. ९० जण मात्र चक्क फेटे घरीच घेऊन गेले. यामुळे या फेट्यांच्या भरपाईपोटी प्रतिनग ५५० रुपये ठेकेदाराला द्यावे लागणार आहेत. ही रक्कम सुमारे ४९ हजार ५०० रुपये आहे. स्थायी समितीनेही हा निधी देण्यास गुपचूप मान्यता दिली होती. मात्र, आता ही रक्कम नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)