शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक ते खासदार

By admin | Updated: May 19, 2014 01:43 IST

वडिलांसाबेत राजकीय सभांना जात असतानाच समाजकारणाचे बीज मनात पेरले गेले.

मंगेश पांडे, पिंपरी - वडिलांसाबेत राजकीय सभांना जात असतानाच समाजकारणाचे बीज मनात पेरले गेले. त्यानंतर ज्येष्ठ बंधू हिरामण यांच्याकडून राजकारणाचा वसा घेत राजकारणात उतरलेल्या श्रीरंग ऊर्फ अप्पा चंदू बारणे यांनी १७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नगरसेवक ते खासदार असा यशस्वी प्रवास केला. या सर्व प्रवासात त्यांना कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. राजकारणात उतरणे आणि निवडणुका लढवून पदे भूषविण्यासाठी कसरतच करावी लागते. यासाठी कुटुंबासह मित्र परिवाराचीही साथ असावी लागते. हीच साथ बारणे यांना मिळाल्याने त्यांना लोकसभेपर्यंत भरारी मारता आली. शहरातील बारणे घराणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठित घराणे मानले जाते. या घराण्यातीलच अप्पा खासदारपदापर्यंत पोहोचले तरी त्यांच्यातील सामान्य माणसाची ओळख कायम आहे. राजकारणातील आक्रमक पण संयमी असे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय निर्णय अप्पा स्वत: घेत असले तरी कुटुंबातील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सौभाग्यवती सरिता याच घेतात. वडिलांपाठोपाठ ज्येष्ठ बंधूंचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन असते. प्रत्येक कार्यकर्त्यांची कुटुंबातील सदस्याप्रमाणेच अप्पा काळजी घेतात. घरी आलेला कार्यकर्ता चहापान केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. विरोधकांनीही जवळचे वाटणारे अप्पा राजकारणातील निर्णयही तितकेच चोखंदळपणे घेतात. बारणे यांचे पहिली ते दुसरी शिक्षण थेरगावच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. बारणे कुटुंबीय १९७० साली गावठाण येथून पद्मजी मिलशेजारी रहायला गेले. पुढील शिक्षणासाठी वडिलांनी त्यांना चिंचवडमधील श्री फत्तेचंद जैन शाळेत टाकले. दोन भाऊ व पाच बहिणी असा परिवार. घरात सर्वांत लहान लाडाचं शेंडफळ असल्याने वडील त्यांना सोबतच ठेवायचे. स्वभाव हट्टी असल्याने अनेक लाड पुरविले जात. दहावीपर्यंतचे शिक्षण श्री फत्तेचंद जैन शाळेत झाले. तारुण्यात पदार्पण करताच ४ वर्षे कोल्हापुरात राहून शाहूपुरी तालमीत सराव केला. करिअर म्हणून कुस्तीच्या आखाड्यात न उतरता शरीर कमाविण्याच्या हेतूने त्यांनी तालिम केली. १९८४ ला ते पुण्यात परतले. व्यवसायात स्थिरावल्यानंतर राजकारणात पदार्पण केले. त्यांनी त्यानंतर विविध पदे भूषविली. त्यांनी खासदारकीपर्यंत मजल मारली.