शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus Test: खासगी लॅबचा 'कोरोनाबाधित' गोंधळ मिटला; ICMRकडून देशभरासाठी नव्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 20:36 IST

CoronaVirus RTPCR test Result: जगभरात RTPCR टेस्टचा सायकल थ्रेशोल्डचा (CT) कट ऑफ हा 35 ते 40 च्या रेंजमध्ये असतो. मात्र, ICMR ने देशभरातील विविध लॅबोरेटरीजकडून मागविलेल्या माहितीवरून देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे.

देशात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित (Corona Positive Patient) सापडू लागले आहेत. यापैकी अनेक रुग्ण हे लक्षणे नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकट्या मुंबईतील 80 टक्के रुग्ण कोरोनाची लक्षणे नसल्याचे आढळले होते. केवळ कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्यांची टेस्ट केली असताही अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पॅथोलॉजी लॅबची (Pathology Lab) तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आयसीएमआरने (ICMR) कोरोना चाचणीचा देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविला आहे. (ICMR guideline for Private labs who testing Corona Samples. )

जगभरात RTPCR टेस्टचा सायकल थ्रेशोल्डचा (CT) कट ऑफ हा 35 ते 40 च्या रेंजमध्ये असतो. मात्र, ICMR ने देशभरातील विविध लॅबोरेटरीजकडून मागविलेल्या माहितीवरून देशभरासाठी एकच फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. यानुसार आरटीपीसीआर टेस्टचा सीटी व्हॅल्यूचा कट ऑफ 35 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या रुग्णाला कोरोना पॉझिटिव्ह ठरविण्यात येणार आहे. तर त्यापेक्षा सीटी व्हॅल्यूचा कट ऑफ हा 35 पेक्षा जास्त असेल तर त्याला निगेटिव्ह ठरविण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांचा कट ऑफ 35 पेक्षा कमी आणि त्यांच्यात कोणतीच लक्षणे दिसत नसतील तर त्यांना कोरोना पॉझिटिव्ह न ठरविता त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र सरकारने आरटीपीसीआर टेस्टचे रिस्ट्रक्चर करण्याची विनंती केली होती. यामध्ये 24 पेक्षा कमी सीटी व्हॅल्यू असलेल्या रुग्णांनाच कोरोनाबाधित समजण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी आयसीएमआरने फेटाळून लावत महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण निगेटिव्ह आल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.  

क्रस्ना डायग्नोस्टिकच्या पल्लवी जैन म्हणाल्या, “ वेगवेगळ्या लॅब वेगवेगळे कीट वापरतात. त्यातून नेमकं कोणाला पॉझिटिव्ह धरायचं याबाबत गोंधळ निर्माण होत होता. देशभरात हा प्रश्न होता. त्यामुळे आता आयसीएमआरने हे स्टॅडर्डायझेशन केलं आहे. यामुळे आता पॅाझिटिव्ह साठी सिटी व्हॅल्यु तर स्पष्ट झाली आहेच पण रीटेस्टचे ही स्पष्टीकरण दिल्याने आता पॅाझिटिव्ह रुग्ण सापडून त्यांचे आयसोलेशन करायला मदत होईल जेणेकरुन असिम्प्टोमॅटिक लोक सापडून त्यांचे विलगीकरण देखील होवून प्रसार रोखला जावू शकेल”.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारPathology Labपॅथॉलॉजी लॅब