शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत शिखर काठ्यांचा जल्लोषावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत रविवारी शिखर काठ्यांची यात्रा झाली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी भरणारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत रविवारी शिखर काठ्यांची यात्रा झाली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी भरणारी माघ पौर्णिमेची यात्रा रद्द झाल्याने शिखरी काठ्यांचा जल्लोष नव्हताच. केवळ संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे यांच्या मानाच्या काठीने देवदर्शन उरकले. स्थानिक होळकर काठीने मात्र होळकर मंदिरातच मानपान स्वीकारत यात्रा पूर्ण केली.

सकाळी ११.३० वाजता संगमनेरकर होलम आणि दुपारी ३ वाजता सुपेकर खैरे यांच्या शिखरी काठ्यांनी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत गडकोटात जाऊन येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण करीत देवभेटी उरकल्या. होलम काठीसोबत फक्त १० व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला होता. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी आणलेली होती. तर खैरे काठीसोबत फक्त पाच व्यक्तींनाच स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती.

तीर्थक्षेत्र जेजुरीत दरवर्षी माघ पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. राज्यभरातून लाखांवर भाविक येथे येऊन कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेत असतात. यात्रा दोन दिवस असते. कोविड प्रादुर्भावामुळे यंदा प्रशासनाने ही यात्रा रद्द केली होती. मात्र, नियमित भाविकांनी गडावर जाऊन देवदर्शन उरकले. द्रव संस्थान आणि प्रशासनाने यात्रेचे योग्य नियोजन केले होते. यामुळे यंदा यात्रा भरली नसली तरीही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होणारी शिखरी काठ्यांचा पारंपरिक देवभेटीचा सोहळा अगदी मोजक्याच भाविकांच्या आणि केवळ मानाच्या काठीच्याच देवभेटीने झाला.

- मार्तंड देवसंस्थानकडून संगमनेर कर होलम काठीचे मानकरी तुकाराम काटे, भिकाजी गुंजाळ, दिलीप गुंजाळ, काशिनाथ होलम उमेश शिंदे, भाऊसाहेब जगताप तर सुपेकर खैरे काठीचे मानकरी नीलेश खैरे, अजित खैरे, दिलीप खैरे, अभय खैरे आदींचा सत्कार केला.

पोलिसांनीही यात्राकाळात चार पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जेजुरीकरांनी प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिल्याने यात्रा शांततेत पार पडली.

- जेजुरी गडावर शिखर काठ्यांची देवभेट सोहळा कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला