शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या पूर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव, अनेकांचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

शिरसगाव काटा येथे बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू दहा दिवसांपूर्वी शिरसगाव काटा येथे प्रदीप श्रीरंग जाधव यास कोरोनाची लागण झाल्याने शिरूर ...

शिरसगाव काटा येथे बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

दहा दिवसांपूर्वी शिरसगाव काटा येथे प्रदीप श्रीरंग जाधव यास कोरोनाची लागण झाल्याने शिरूर येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले होते. यानंतर त्याचे वडील श्रीरंग जाधव यांनाही मुलाच्या मृत्यूचा जबर धक्का बसल्याने पाच दिवसांपूर्वी दुर्दैवी राहत्या घरी निधन झाले होते.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात वाढलेले रुग्ण तसेच अचानक तरुण व घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात कोरोना आजाराचा मोठा संसर्ग झाला आहे. एप्रिल महिना ते आजपर्यंत या भागात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील पोपट ज्ञानदेव जगताप याचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता. या झालेल्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी आई वच्‍छलाबाई ज्ञानदेव जगताप यांचाही दुर्दैवी मुत्यू झाला असल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. परिसरात मध्यंतरी ढगाळ वातावरण झाल्याने त्या वेळी पोपट जगताप हे कांदा सुरक्षित राहावा यासाठी वखार तयार करण्यासाठी धावपळ करत असताना त्यांना या आजाराची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवायला लागली. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोपट जगताप यांच्यावर घरातील सर्व कौटुंबिक जबाबदारी होती, पण घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पोपट जगताप यांना कोरोना झाल्यानंतर त्याची लागण त्याची आईला झाली होती. मुलाचा अंत्यविधी कोठे होत नाही तोच मृत्यूने आईलाही हिरावून नेले. शेवटी पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे आईला सहन न झाल्याने आईने दुसऱ्या दिवशी आपला प्राण सोडला.