शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागले बदलीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वार्षिक नियतकालिक बदल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वार्षिक नियतकालिक बदल्या ३० जूनपर्यंत करू नयेत, असे आदेश काढले होते. आता शासन आणखी मुदतवाढ देणार की बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनामध्ये शासनाकडून आणखी काही दिवस मुदतवाढ देण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्यामध्ये केल्या जातात. परंतु, यंदा कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढल्याने निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३० जूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया थांबली आहे. तसेच सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या जागेवर तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरण्यास मात्र परवानगी दिली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास त्याची बदली करणे आवश्यक असेल तर सक्षम प्राधिकारी खात्री करून त्याची बदली करू शकतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आता ही ३० जूनची मुदतवाढ देखील संपत आल्याने कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहेत.