शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे उद्यान विभागाला ११ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST

पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागाला यंदा कोरोनाचा फटका बसला असून, तब्बल ११ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. प्राणी संग्रहालये, उद्याने, ...

पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागाला यंदा कोरोनाचा फटका बसला असून, तब्बल ११ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. प्राणी संग्रहालये, उद्याने, प्रदर्शने बंद असल्याने विभागाचे उत्पन्न बुडाले असून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यास आणखी फटका बसू शकतो.

पालिकेच्या उद्यान विभागाचे शहरात कात्रज प्राणी संग्रहालयासह २०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. मार्चमध्ये जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होते, तेव्हाच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सर्व उद्याने आणि प्राणी संग्रहालये बंद करण्यात आली. आताशा उद्याने निर्बंधांसह सुरु झाली आहेत. उद्यानांमध्येही व्यायाम, खेळ आदींना बंदी घालण्यात आली आहे. केवळ चालण्याकरिता उद्यानांचा वापर करण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यातच कोरोना पुन्हा वाढू लागल्याने ही उद्याने पुन्हा बंद करावी लागतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

उद्यान विभागाकडून दर वर्षी फळे-फुले-भाजीपाला महोत्सव आयोजित केला जातो. यासोबतच जून ते ऑगस्टदरम्यान वन महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात अल्पदरात रोप विक्री केली जाते. जवळपास ३५ ते ४० हजार रोपांची विक्री या महोत्सवामध्ये केली जाते. यासोबतच दिवाळीमध्ये किल्ले प्रदर्शन, जागतिक पर्यावरण दिन, वन्य प्राणी सप्ताह आदी उपक्रम राबविले जातात. यामधूनही उद्यान विभागाला ११ ते १२ कोटींचा महसूल मिळत असतो. परंतू, मागील ११ महिन्यांपासून कोरोनामुळे उद्याने आणि सर्व उपक्रम बंद असल्याने यंदा एक कोटीचेही उत्पन्न मिळालेले नसल्याचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले.