शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कोरोना अजून हद्दपार झालेला नाही, काळजी घ्या : भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

इंदापूर शहरातील पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य सभागृहात इंदापूर तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची व पदाधिकारी यांची आढावा बैठक शनिवार ...

इंदापूर शहरातील पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य सभागृहात इंदापूर तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची व पदाधिकारी यांची आढावा बैठक शनिवार (दि.२९) रोजी सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, बहुजन मुक्ती पार्टीचे ॲड. राहुल मखरे, पीआरपीचे नेते संजय सोनवणे, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, तसेच इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, नगरसेवक स्वप्निल राऊत, इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील ज्या नागरिकांना कोरोना आजार झाला होता. यातून जे रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशा सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करून म्युकरमायकोसिस रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यात विशेष शिबिर भरवण्यात येईल. यामुळे पुढे होणारा रुग्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने तत्काळ घ्यावी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील बालक तिसऱ्या लाटेत सापडू नये यासाठी प्रत्येक पालकांना आरोग्य विभागाच्या व प्रशासनाच्या वतीने माहिती पुस्तका घरपोच केली जाईल,अशी माहिती देऊन राज्यमंत्री भरणे म्हणाले, इंदापूरच्या आरोग्य विभागासाठी एक कोटी रकमेचे नवीन अद्ययावत साहित्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध केलेले आहे. आणखी बालरोगतज्ज्ञ यांची टीम तयार केली असून जी उपचारासाठी साधनसामग्री लागणार आहे. ती लवकर उपलब्ध केली जाईल.

इंदापूर येथील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.