शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शोधप्रबंधात ‘कॉपी पेस्ट’च

By admin | Updated: May 11, 2017 04:45 IST

पीएचडीसाठी झालेल्या संशोधनाचा पुढे फारसा उपयोग होत नाही, असे सांगत राज्यातील संशोधनाबाबतच शंका व्यक्त करीत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पीएचडीसाठी झालेल्या संशोधनाचा पुढे फारसा उपयोग होत नाही, असे सांगत राज्यातील संशोधनाबाबतच शंका व्यक्त करीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निम्म्याहून अधिक पीएच.डी.चे शोधप्रबंध ‘कॉपी पेस्ट’ किंवा वेतनवाढ आणि पात्रता मिळविण्यासाठीच केलेले असतात, अशी खंत जाहीरपणे व्यक्त केली. भारती विद्यापीठाच्या ५३व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, भीमराव तापकीर, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन आणि शोधप्रबंधांच्या स्थितीवर बोलताना तावडे म्हणाले, की विद्यापीठांमध्ये पीएचडीसाठी सादर केले जाणारे निम्म्याहून अधिक प्रबंध कॉपी पेस्ट असतात. इतर प्रबंधांमधून ते घेतले जातात. केवळ वेतनवाढ मिळविणे, प्राचार्य किंवा विभागप्रमुख म्हणून बढती मिळण्यासाठी आणि नावापुढे ‘डॉक्टर’ लावण्यासाठी प्रबंध सादर केले जातात. हे संशोधन पुढे उपयोगात येताना दिसत नाही. मोहनदास पै समितीच्या अहवालानुसार राज्यातील पीएच.डी.पैकी १.०३ टक्के प्रबंधांचे संदर्भ (सायटेशन) वापरले जातात. संशोधनाचा वापर पुढील पुढील संशोधनासाठी होऊन संशोधन केंद्र उभी राहणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्व विद्यापीठांना त्यांच्या प्रबंधांची माहिती आॅनलाइन टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रबंधांची नक्कलही होणार नाही. सध्या शिक्षणामधून बेकारांची फौज निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देण्याची गरज असल्याचेही तावडे म्हणाले.