शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी नळपट्टी भरून पालिकेला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:28 IST

जेजुरी : वेगवेगळ्या माध्यमांद्वारे, तसेच फ्लेक्स प्रसिद्धीद्वारे घरपट्टी भरू नये, असा प्रसार केला जात आहे. तसेच ...

जेजुरी : वेगवेगळ्या माध्यमांद्वारे, तसेच फ्लेक्स प्रसिद्धीद्वारे घरपट्टी भरू नये, असा प्रसार केला जात आहे. तसेच नगरपालिकेने कोरोनाच्या संकटामुळे घरपट्टी रद्द करावी, अशा मागणीचा प्रस्ताव देवून शासनाकडे केली आहे. मात्र याबाबत कोणताही शासन निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे जेजुरीकर नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून जेजुरी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी केले आहे.

जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने २०१८ -२०२९ ते २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता शहरातील मालमत्तेचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणापूर्वी नगरपरिषदेने नगररचनाकार बारामती यांच्याकडून चतुर्थ वार्षिक कर आकारणी साथीचे दर प्रति १० टक्के या प्रमाणे शहरातील झोन व बांधकामाचे वयोमानानुसार दरास मंजुरी घेतली होती. त्यानुसार कर आकारणी करण्यात आली होती. वरील दराप्रमाणे मालमत्तेच्या आकारणीत ४० टक्के दराने वाढ झाली होती. कोरोनामुळे गेल्यावर्षी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे जेजुरी शहरात भाविक येणे बंद झाले व सर्व आवक जावक थंडावली गेली. नागरिकांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्याने नगरपालिकेच्या वसुलीवर झाला. या घरपट्टी वाढीबाबत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. भोर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून या समितीने ४० टक्के ऐवजी २० टक्के दराने कर आकारणी कमी करण्यात आली. मागील वर्षे व यावर्षीची घरपट्टी व पाणी पट्टीचे बिले नागरिकांना देण्यात आली आहेत. ज्यांनी मागील बिले भरली नाहीत या बिलांवर थकबाकी दाखविण्यात आलेली आहे. थकबाकी दाखविल्याने काही नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. संभ्रम दूर करण्यासाठी नागरिकांनी पालिकेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व नागरिकांची घरपट्टी माफ करावी यासाठी नगरपालिकेच्या वतीने सर्वानुमते ठराव मंजूर करून त्यानुसार घरपट्टी रद्द करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय झालेला नाही.त्यामुळे नागरिकांनी आपली घरपट्टी व पाणी पट्टी भरून नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पूनम कदम यांनी केले आहे.