शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

केबल डक्ट कामावरून वादाची ठिणगी

By admin | Updated: May 6, 2017 02:42 IST

काही इंटरनेट कंपन्यांनी स्वखर्चाने २४ तास पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनच्या डक्टचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : काही इंटरनेट कंपन्यांनी स्वखर्चाने २४ तास पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनच्या डक्टचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी याच कामासाठी तब्बल २२५ कोटी रुपयांच्या एस्टिमेट मंजुरीसाठी अग्रह धरला आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या एस्टिमेटला विरोध केला आहे. यामध्ये आयुक्त आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेतील सुमारे १,८०० किलोमीटर पाईपलाईनचे काम करण्यासाठी १,७१८ कोटी रुपयांच्या चार निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदांतील अटी आणि शर्तींवरून हे काम एल अँड टी या कंपनीलाच देण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार प्रयत्नशील असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. अशातच पाईपलाईनच्या कामाच्या निविदेत आयुक्त यांनी २२५ कोटी रुपयांची केबल डक्टची कामे करावीत, हा मुद्दा नंतर घातला आहे. अगदी निविदा उघडण्याची वेळ आल्यानंतर आयुक्तांनी केबल डक्टच्या कामांचा प्रस्ताव महापालिका अधिकाऱ्यांच्या एस्टिमेट कमिटीपुढे ठेवला आहे. काल झालेल्या कमिटीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी पाईपलाईनच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर एस्टिमेट करण्याचा निर्णय फेटाळून लावला. तसेच, या डक्टचा वापर करणाऱ्या इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत या डक्टच्या कामांबाबत संपर्क साधला.या वेळी काही कंपन्यांनी स्वखचार्तून महापालिकेला डक्ट बांधून त्यामध्ये एक स्लॉट महापालिकेसाठी ठेवण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे, तर महापालिकेकडे जमा करावे लागणारे शुल्कही देण्याची तयारी दर्शविली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.महापालिका आयुक्तांनी आज पुन्हा कमिटीने डक्टच्या कामाच्या एस्टिमेटला मंजुरी द्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. आयुक्तांच्या आदेशावरून दुपारी तीन वाजता कमिटीची बैठकही ठरली. परंतु, ऐन वेळी या कमिटीचे मुख्य अधिकारीच काही कामानिमित्त बाहेर गेल्याने बैठकच होऊ शकली नाही. यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.एल अँड टी कंपनीला पाईपलाईन आणि डक्टचे काम मिळावे, यासाठी आयुक्तांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्यानेच ते महापालिकेच्या खर्चातून डक्टचे काम करण्यास आग्रही आहेत. यासाठी ते पुणेकरांच्या करातून आलेल्या महापालिकेच्या २२५ कोटी रुपयांची उधळपट्टी करायलाही तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.