शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोतावळ्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क

By admin | Updated: February 13, 2017 01:30 IST

महानगरपालिकेच्या अवाढव्य मतदारसंघांमुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून, ‘मिनी आमदार’ होण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उमेदवारांनी

पुणे : महानगरपालिकेच्या अवाढव्य मतदारसंघांमुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून, ‘मिनी आमदार’ होण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उमेदवारांनी आपले आप्त, मित्र, सगेसोयरे अशा गोतावळ्याला प्रचारकार्यात सामावून घेतले आहे. उमेदवारांऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून जात हे आप्त आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत.शहरासह उपनगरांमध्ये उंच इमारतींची संख्या मोठी आहे. त्यातच वॉर्ड पद्धतीऐवजी प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने उमेदवारांना घरोघर पोहोचणे जिकीरीचे झाले आहे. उमेदवारी निश्चिती होण्यापूर्वी ज्यांना तिकिटाची खात्री होती, अशा काही उमेदवारांनी सोसायट्या, बंगले, रो हाऊस अशा भागांसह वाडे, चाळी, झोपडपट्ट्या अशा वस्त्यांमध्ये एक ते दोन वेळा धावत्या भेटी दिल्या. त्यामुळे आपल्या भागात कोण उमेदवार असू शकतील, याचा अंदाज मतदारांना बांधता आला. ज्या प्रभागांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चिती झाली नाही, त्या ठिकाणी मतदारांमध्येही उमेदवारांविषयी संदिग्धता होती. उमेदवारी निश्चित होण्याच्या कालावधीपासून मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत १२ दिवस प्रत्यक्ष प्रचारासाठी हाती होते. प्रचारासाठी ७ दिवसांचा अवधी उरल्याने उमेदवारांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू आहे. आजच्या रविवारी सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचाराची धांदल दिसून येत होती.