शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम नियमावली सोमवारी सादर होणार

By admin | Updated: November 4, 2015 04:12 IST

पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली सादर करण्यासाठीची मुदत येत्या ९ नोव्हेंबरला पूर्ण होत असल्यामुळे हा आराखडा तयार करणाऱ्या

पुणे : पुणे शहर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याची बांधकाम नियंत्रण नियमावली सादर करण्यासाठीची मुदत येत्या ९ नोव्हेंबरला पूर्ण होत असल्यामुळे हा आराखडा तयार करणाऱ्या त्रिसदस्यीय समितीकडून सध्या युद्धपातळीवर याबाबतचे काम सुरू आहे.शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा असतो. पुणे महापालिकेच्या नियोजन समितीकडून हा आराखडा मुदतीत तयार होत नसल्याचे कारण देत राज्य सरकारने तो काढून घेतला व त्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, महापालिका आयुक्त कुणाल कुमार व सहसंचालक नगर रचना प्रकाश भुक्ते अशी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. त्यांना ६ महिन्यांची मुदत देण्यात आली. या समितीने मुदतीत आराखडा तयार करून, तो राज्य सरकारला सादर केला; मात्र त्यासाठी बांधकाम नियंत्रण नियमावली तयार केली नव्हती. त्याासाठी समितीने राज्य सरकारकडे ४५ दिवसांची मुदत मागितली होती.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, येत्या सोमवारी (दि. ९) ४५ दिवसांची मुदत पूर्ण होत आहे. नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यावर टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आराखड्याच्या विरोधात मोर्चा काढला, तर काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी ‘रस्तारुंदीविरोधी कृती समिती’ स्थापन करून आंदोलन सुरू केले आहे. विभागीय आयुक्तांच्या समितीने सप्टेंबर २०१५ अखेर हा डीपी राज्य शासनाकडे सादर केला आहे. डिसीरूल तयार करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांची मुदत मागण्यात आली होती; मात्र डीपीला जानेवारी महिन्यात राज्यसरकार अंतिम मान्यता देणार आहे. त्यामुळे डीपीचे डीसीरूल येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याचे आदेश राज्यसरकारने विभागीय आयुक्तांच्या समितीला लेखी दिले आहे.