शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर उड्डाणपुलावर सातत्याने वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST

हडपसर : हडपसर-सासवड रस्ता भेकराईनगरपर्यंत रुंदीकरण केल्यानंतर पदपथ आणि सायकल ट्रॅकही केला. सुरुवातीला नागरिकांनी सायकलही चालविली. मात्र, अवघ्या काही ...

हडपसर : हडपसर-सासवड रस्ता भेकराईनगरपर्यंत रुंदीकरण केल्यानंतर पदपथ आणि सायकल ट्रॅकही केला. सुरुवातीला नागरिकांनी सायकलही चालविली. मात्र, अवघ्या काही महिन्यांत सायकल ट्रॅक आणि पदपथाची जागा दुकानदार आणि वाहनचालकांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता नाही, सायकलचालकांना ट्रॅक शिल्लक नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्तारुंदीकरण करताना पदपथ आणि सायकलट्रॅक कोणत्या उद्देशाने केले होते, याचा खुलासा महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हडपसर-सासवड रस्त्याचे काँक्रिटीकरण, पदपथ आणि सायकलट्रॅक बनविण्यासाठी नागरिकांनी कररूपी भरलेल्या लाखो रुपयांची उधळपट्टी केली. त्याचा वापर अवघ्या काही दिवसात संपला. पदपथ आणि सायकलट्रॅकवर ट्रॅव्हल कंपन्यांची वाहने दिवसरात्र उभी असतात. पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचारी आणि सायकलट्रॅक चोरीली गेल्याची तक्रार कोणाकडे द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार सुरू आहे. तरीसुद्धा त्यातील एकालाही कोणी जाब विचारताना दिसत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

रस्त्याने चालणे जिकिरीचे झाले आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. पदपथ आणि सायकलट्रॅक ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या वाहनांनी व्यापून टाकले आहेत, प्रभागाचा विकास म्हणजेच नागरिकांचा विकास असा धोशा लावणारे लोकप्रतिनिधी आता गेले तरी कोठे, अशी विचारणा आता नागरिक थेट करू लागले आहेत.

फुरसुंगी उड्डाण पूल सतत जॅम

फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगवर वाहतूककोंडी होत होती. म्हणून उड्डाण पूल उभारला. मात्र, दूरगामी विचार न करता उड्डाणपूल उभारल्याने आता या पुलावर सतत वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक कमालीचे मेटाकुटीला आले आहेत. उड्डाण पुलावरील पदपथ काढून रस्ता रुंदीकरण केले, तर वाहतूककोंडी समस्या सुटण्यास मदत होईल. त्यासाठी हडपसर वाहतूक विभागाकडून वारंवार रस्ते विभागाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप, त्याला मुहूर्त मिळाला नाही, त्यामुळे वाहनचालकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.

फोटो : फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलावर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे.