शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ‘ओशो आश्रम’ नष्ट करण्याचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : येथील ओशो आश्रम भारतातून परदेशात हलविण्याचा घाट घातला जात आहे. ओशोंचा वारसा हा केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : येथील ओशो आश्रम भारतातून परदेशात हलविण्याचा घाट घातला जात आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा नसून, संपूर्ण जगाचा वारसा आहे. मात्र, ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असून, सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी ओशो संन्यासी स्वामी गोपाल भारती आणि स्वामी झोरबा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले, की ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि सध्याच्या व्यवस्थापन समितीद्वारे १८०० कोटींचा घोटाळा केलेला आहे. ओशो संन्याशांना समाधीपर्यंत जाण्यास बंदी करून धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशोंना एक रहस्यदर्शी सद्गुरू न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे.

येणाऱ्या पिढ्यांनी ओशोंना विसरून जावे यासाठी हे कारस्थान रचले जात आहे, असा आरोप करून स्वामी गोपाल भारती आणि स्वामी झोरबा म्हणाले, की ओशोंची जगभरातील ६० ते ७० विविध भाषांत अनुवादित ग्रंथसंपदेची ‘रॉयल्टी’ कुठे जात आहे, याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विक्रीपासून वाचविण्याची नाही, तर या सर्व प्रकाराची सीबीआय व ईडीमार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी. यासंदर्भात अनेक संन्याश्यांनी धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.