शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

उद्योजकांचे बळ पालिकेशी कनेक्ट

By admin | Updated: November 10, 2015 01:55 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे महापालिकेशी उद्योजकांचे व्यासपीठही कनेक्ट होणार आहे. उद्योगांच्या सहकार्यातून अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यास महापालिकेला बळ मिळणार आहे.

पुणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे महापालिकेशी उद्योजकांचे व्यासपीठही कनेक्ट होणार आहे. उद्योगांच्या सहकार्यातून अनेक विकासाची कामे मार्गी लावण्यास महापालिकेला बळ मिळणार आहे. शहरातील विविध उद्योगांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ‘पुणे सिटी कनेक्ट’ ही कंपनी व पुणे महापालिका यांच्यात शहरातील विविध कामांच्या संदर्भात सहकार्य व सहयोग यासाठी सोवारी सामंजस्य करार झाला. गुणवत्तापुर्ण शिक्षण, डिजीटल एज्युकेशन, स्वच्छता, पर्यटन आदी विषयांवर प्रामुख्याने काम करण्यात येणार आहे.‘पुणे सिटी कनेक्ट’ चे चेअरमन गणेश नटराजन आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यावेळी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, ‘पुणे कनेक्ट कंपनी’च्या सीईओ रूचा माथूर व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यातील उद्योगांच्या या सहकार्यातून विकासाची अनेक कामे होतील, उद्योजकांचा हा प्रयत्न पुणे शहराला भविष्यात एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल अशी भावना यावेळी सर्व वक्त्यांनी प्रकट केली. कुणाल कुमार यांनी उद्योगांचे हे व्यासपीठ पुणे महापालिकेला मिळाल्यामुळे एक मोठी शक्ती मिळाली असल्याचे सांगितले. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही उद्योगांनी दाखवलेल्या या विकासात्मक दृष्टिकोनासाठी त्यांचे आभार मानले. ‘पुणे कनेक्ट’ मध्ये आणखी कंपन्या सहभागी होतील व महापालिकेच्या सहकार्याने नागरिकांच्या स्वप्नातील पुणे प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते राजेंद्र वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, महेंद्र पठारे आदी यावेळी उपस्थित होते. अनू आगा,आनंद देशपांडे, अंशू गौर, अरूण नाथानी, अश्विनी मल्होत्रा, शीतल बापट, अतूल चोरडिया, कुमार गेरा, रजनिश मालवीय, समीर गाडगीळ, रामप्रसाद, अजय मेहता, रमेश मिराखूर, अश्विन भांडारकर, अनंत सरदेशमूख, आदेश गोखले, उमा गणेश, वैभवी पाठक, मनोज साकटे, पल्लवी देशपांडे आदी उद्योजक यावेळी उपस्थित होते. रूचा माथूर यांनी सुत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)