शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डीपीप्रकरणी काँग्रेसचीही याचिका

By admin | Updated: April 16, 2015 00:59 IST

शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) महापालिकेच्या मुख्य सभेने मंजूर करण्यापूर्वीच राज्य शासनाने तो ताब्यात घेतल्याच्या विरुद्ध महापालिका न्यायालयामध्ये जाणार आहे.

पुणे : शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) महापालिकेच्या मुख्य सभेने मंजूर करण्यापूर्वीच राज्य शासनाने तो ताब्यात घेतल्याच्या विरुद्ध महापालिका न्यायालयामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसनेही स्वतंत्रपणे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.शहराच्या डीपीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच मुदत संपल्याचे कारण देऊन राज्य शासनाने ती ताब्यात घेतली आहे. शासनाच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. महापालिकेच्या मुख्य सभेत राज्य शासनाचा निषेध करून शासनाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये महापालिकेने याचिका दाखल करावी, असा ठराव मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक प्रशांत जगताप व माजी नगरसेवक नीलेश निकम यांनी याचिका दाखल केली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनीदेखील उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या या दोन्ही याचिकांवर येत्या १० जूनला एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे.सरकारच्या दोन संस्थांमध्ये मतभेद झाले तर उच्चाधिकार समिती स्थापन करावी, असा अभिप्राय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप कर्णिक यांनी दिला आहे. त्यानुसार उच्चाधिकार समिती स्थापन करण्याबाबत महापालिकेकडून राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. दुसरीकडे डीपीला अंतिम स्वरूप देण्यासाठी शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. (प्रतिनिधी)शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे पूर्ण अधिकार महापालिकेला आहेत. त्यामध्ये काही बदल करावेसे वाटले तर राज्य शासन करू शकते. मात्र, महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी देण्यापूर्वीच तो ताब्यात घेण्याची राज्य शासनाची कृती पूर्णपणे चुकीची आहे अशी पालिका प्रशासनाची भूमिका आहे. राज्य सरकारने डीपी संपल्याची मुदत संपल्याचे कारण देऊन डीपी ताब्यात घेतला. वस्तुत: राज्य सरकारने हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी नियोजन समितीवर शासकीय सदस्यांची समिती नेमण्यासाठी ११ महिने उशीर केला. डीपीवर चर्चा करण्यासाठी पालिकेला केवळ २४० दिवस देण्यात आले. तरीही शासनाने हा डीपी ताब्यात घेतल्याने शासनाविरोधात याचिका दाखल केली. - अ‍ॅड. अभय छाजेड