शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आईला पोटगी न दिल्याने मुलाची जंगम मालमत्ता जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आईला दरमहा ५ हजार रूपये पोटगी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून पोटगी भरण्यास कसूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आईला दरमहा ५ हजार रूपये पोटगी देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून पोटगी भरण्यास कसूर केल्याप्रकरणी न्यायालयाने मुलाची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी.एम निराळे यंनी हा आदेश दिला आहे. न्यायालयाने मुलास आईला दरमहा पाच हजार रूपये इतकी पोटगी देण्याचे आदेश दिले होते. परंतु मुलाने आईला पोटगी दिली नाही व न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. मुलाने पोटगी भरण्यास कसूर केल्याने ही पोटगीची थकबाकी रक्कम ४ लाख वीस हजार इतकी बाकी राहिल्याने न्यायालयाने सदर रकमेकरिता मुलाची जी जंगम मालमत्ता आहे ती जप्त करावी असे आदेश बंडगार्डन पोलिसांना दिले आहेत. या केसमधील अनुसया सोनी यांचे पती वारले आहेत. त्यांचा मुलगा आनंद सोनी हा त्यांना सांभाळत नसल्याने त्यांनी अ‍ॅडव्होकेट सुरेंद्र आपुणे व रमेश परमार यांच्या वतीने न्यायालयांमध्ये अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना दरमहा रक्कम रुपये पाच हजार इतकी पोटगी मंजूर केली होती व मुलास ती भरण्याचे आदेश दिले होते.अनुसया सोनी यांना जगण्याकरिता पोटगी व्यतिरिक्त इतर कुठलेही साधन नाही. लोक डाऊन पूर्वी न्यायालयाने मुलगा आनंद सोनी यास काही पोटगी करिता काही रक्कम भरण्यास सांगितले होते. परंतु त्याने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले म्हणून न्यायालयाने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट मुलाच्या विरूद्ध काढले.