शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

एमबीएसाठी जात प्रमाणपत्राची अट शिथिल

By admin | Updated: May 24, 2014 05:00 IST

व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांसाठी आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट तंत्रशिक्षण परिषदेने (डीटीई) शिथिल केली आहे

पुणे : व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांसाठी आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट तंत्रशिक्षण परिषदेने (डीटीई) शिथिल केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर तीन महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करता येईल. या निर्णयामुळे एमबीए आणि तत्सम अभ्यासक्र माला प्रवेश घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. वाणिज्य शाखेतील एमबीए, एमएमएस, पीजीडीएम असे व्यवस्थापनशास्त्र विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय, प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका डीटीईने जाहीर केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (बार्टी) जात प्रमाणपत्र देण्यावर पुरेसे मनुष्यबळ नसल्याने मर्यादा येत आहे. संपूर्ण राज्यामध्ये जात पडताळणीसाठी फक्त १५ समित्या आहेत आणि प्रलंबित प्रकरणे ९० हजारांच्या वर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्रे देता येणार नाहीत, असे बार्टीने डीटीईला कळविले आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्यात आली असल्याचे डीटीईतर्फे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रवेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यासंदर्भात, भारिप बहुजन महासंघातर्फे समाजकल्याण आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना राखीव कोट्यातून प्रवेश द्यावा आणि प्रमाणपत्रासाठी ९० दिवसांची मुदत द्यावी. विद्यार्थी दोषी आढळल्यास त्याला सवलत नाकारून खुल्या गटातून पूर्ण फी घेऊन प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)