शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नाक, कान, घशांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:37 IST

हिवाळयाची चाहूल लागताच दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधीपर्यंत तापमान बरेच कमी झाल्यामुळे पुणेकरांनी थंडीचा अनुभव घेतला. दिवाळीच्या दिवसांमध्ये गारठा अचानक ...

हिवाळयाची चाहूल लागताच दिवाळीच्या दोन-तीन दिवस आधीपर्यंत तापमान बरेच कमी झाल्यामुळे पुणेकरांनी थंडीचा अनुभव घेतला. दिवाळीच्या दिवसांमध्ये गारठा अचानक कमी झाला आणि तापमानात वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला. आता पुन्हा गारठा निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे अशा नैमित्तिक आजारांनी डोके वर काढले आहे.

व्हायरल आजारांचे प्रमाणही या काळात वाढले आहे. त्यामुळे नाक, कान, घशात संसर्ग होऊन आरोग्याच्या तक्रारींना आमंत्रण मिळत आहे. बदलत्या हवामानामध्ये दिवाळीमध्ये झालेल्या प्रदूषणाचीही भर पडली आहे. त्यामुळेच दिवाळीच्या आधीच्या दिवसांच्या तुलनेत सध्या कान, नाक, घशाचा त्रास उदभवलेल्या रुग्णांची संख्या ४० टक्कयांनी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

---------------------

बदलत्या हवामानाचा नाकाची नाजून अंर्तत्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे संसर्ग होऊन सर्दी वाढीस लागते. सदी घशात उतरली की घसा खवखवणे, घसा दुखणे असे त्रास सुुरु होतात. स्वरयंत्रावरही परिणाम होतो, दाह निर्माण होतो. या काळात सायनसची समस्याही डोके वर काढते. सर्दी छातीत उतरल्यास दम किंवा धाप लागणे असे त्रास उदभवू शकतात. डॉक्टरांच्या सल्लयाने वेळीच योग्य उपचार घेतल्यास तक्रारी दूर करता येऊ शकतात.

- डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ

------------------------

दिवाळीनंतर कानाच्या तक्रारींचे रुग्ण वाढले आहेत. यात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. याशिवात, अ‍ॅलर्जिक सर्दीचा त्रासही सुरु झाला आहे. कान, नाक आणि घशाच्या समस्या एकमेकांशी निगडीत असतात. रुग्णांनी गरम पाणी पिणे, वाफ घेणे, कानात कापसाचे बोळे घालणे, ताजे अन्न खाणे, व्यायाम हे सर्व नियम पाळावेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करुन घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार नियमितपणे घ्यावेत.

- डॉ. मोनालिसा डेब बर्मन, कान-नाक-घसा तज्ज्ञ