शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी अजितदादांकडे तक्रार, रात्री मिळाला न्याय, शिक्षकांची हक्काची जमीन दिली परत मिळवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST

शिक्षकांना मिळाली हक्काची जमीन बारामती : एखादे काम होणारे असेल तर ते तातडीने पूर्णत्वाला नेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ...

शिक्षकांना मिळाली हक्काची जमीन

बारामती : एखादे काम होणारे असेल तर ते तातडीने पूर्णत्वाला नेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हातखंडा आहे. याची प्रचिती रविवारी (दि.२०) फलटण (जि. सातारा) येथील ११ निवृत्त शिक्षकांना आली. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू होता. यावेळी फलटण तालुक्यातील निवृत्त शिक्षकांनी जमीन फसवणुकीबाबतची तक्रार पवार यांच्या कानी घातली. पवार यांच्या सूचनेनुसार बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रविवारी रात्रीच या शिक्षकांची हक्काची जमीन परत मिळवून दिली.

फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर सर्व मिळालेली आयुष्यभरची रक्कम खर्च करून बारामती शहरातील खंडोबानगर येथे ग्रुपमध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती. चांगला भाव विकताना येत असल्याने त्यातील ४० गुंठे जागा शहरातील नामांकित 'तीन एजंट'च्या माध्यमातून विकली. त्या तिघांनी कमिशन तर कमावले व त्याचबरोबर फलटण ग्रुपचा विश्वास संपादित केला. त्यामुळे फलटण शिक्षक ग्रुप त्या तिघांवर खुश होता. आता राहिलेली वीस गुंठे विकण्याची जवाबदारीसुद्धा त्या तिघांवर टाकली. विश्वास संपादित केलेले तिघांनी २० गुंठे विकली व त्यातील फक्त १४ लाख रुपये दिले व राहिलेले १ कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ, आज कायमखुश खरेदी (दस्त नोंदणी) करून द्या, असे विश्वासाने सांगितले. पहिला व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुपने कायमखुश खरेदी करून दिले. परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा. बारामतीमध्ये आमचे कोण वाकडे करू शकणार नाही, अशी भूमिका घेतली फलटण शिक्षक ग्रुपने विनंती केली, हात जोडले. कमिशन वाढवून देण्याची तयारी दर्शवली, मध्यस्थ घातले, तरी ते तिघे रक्कम देईनात. हताश झालेले सर्व वयस्कर शिक्षक अगोदरच रक्तदाब, मधुमेह व विविध व्याधीने त्रस्त होते. सदर घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसल्याने यातील काही जणांना बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अजितदादांच्या सूचना आणि अवघ्या काही तासांत जमीन माघारी मिळाली...

सोमवारी दस्तनोंदणी रितसर होणार होती. त्यामुळे रविवारी (दि.२०) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारात यातील काही जणांनी व्यथा मांडून न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अजित पवार यांनी त्वरित येथे उपस्थित असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा, अशी सूचना केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, फौजदर बाळासोा जाधव, हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस शिपाई अंकुश दळवी, आबासोा चौधर यांनी त्वरित तिघांना पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली. परंतु प्रतिसाद देत नसल्याने पोलीस खाक्या दाखवताच फसवणूक केल्याची कबुली दिली. या तिघांना वाचवण्यासाठी अनेकांनी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. परंतु खाकी वर्दीने चोख काम केले. अखेर दस्त पलटून देण्याचे लिखित स्वरूपात मान्य केले व पुन्हा फसवणूक करणार नसल्याचेसुद्धा लिहून दिले. दादांच्या दरबारात रविवारी सकाळी तक्रार व पोलिसांच्या मदतीने रविवारी रात्री न्याय मिळाल्याने त्या फलटण शिक्षक ग्रुपने समाधान व्यक्त केले.

फसवणूक किंवा धमकी देऊन खरेदीखत केले असेल तर अशा प्रकरणात अन्याय झालेल्या व्यक्तीबाबत सत्यता असेल तर त्यांनासुद्धा न्याय पोलीस देऊ शकतात हेच या प्रकरणातून दिसून येते.

- नामदेव शिंदे

पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे