शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छतावर पडणारे पाणी होणार संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 04:46 IST

यंदाच्या पावसाळ््यापासून महापालिकेच्या ७४ इमारतींवरील ६ लाख चौरस फुट छतावर पडणारे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे संकलित करून जमिनीत जिरविण्याच्या महत्त्वाकांक्षी

पुणे : यंदाच्या पावसाळ््यापासून महापालिकेच्या ७४ इमारतींवरील ६ लाख चौरस फुट छतावर पडणारे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे संकलित करून जमिनीत जिरविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेस मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कामासाठी पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च येणार असून जुलै २०१६ पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.रेनवॉटर हार्वेस्टिंग अंतर्गत इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी गोळा करून ते पाइपद्वारे बोअरवेलमध्ये किंवा खोलवर खड्ड्यात सोडले जाते. शहरामध्ये इमारतींवर ही यंत्रणा बसविणाऱ्या सोसायट्यांना मिळकतकरामध्ये पालिकेकडून सवलत देण्यात येते. मात्र सोसायट्या तसेच नागरिकांकडून या योजनेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेसाठी पुढाकार घेऊन नागरिकांपुढे आदर्श घालून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेची मुख्य इमारत तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या ७४ इमारतींवर हा प्रकल्प उभारण्यास स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली. येत्या जूनअखेरपर्यंत शहरात ७४ ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. इमारतींच्या छतावर पडणारे पाणी गोळा करणे, त्याचे शुद्धीकरण करणे, ते पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी व्यवस्था करणे आदी कामे याअंतर्गत केली जाणार आहेत. शहरामध्ये मागील वर्षी सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने यंदा पुणेकरांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेत. शहराला गेल्या ८ महिन्यांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने त्यांनी बोअर घेतले आहेत. बोअरच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने पाण्याची भूजलपातळी वेगाने घटत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जलपुनर्भरणाच्या कामात सहभाग घ्यावा, यासाठी पालिकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.