शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त, महापौरांच्या परदेशवाऱ्यांवर उधळपट्टी

By admin | Updated: October 1, 2015 00:52 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत एलबीटी बंद झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली. तरीही महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत एलबीटी बंद झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली. तरीही महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर, तसेच नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जाणार आहे. ही उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी सजग नागरिकांकडून होत आहे.महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त होणाऱ्या क्रीडा स्पर्धांवर कोट्यवधीचा खर्च केला जाणार आहे. एलबीटी बंद झाल्याने महापालिकेचे उत्पन्न निम्याने घटले आहे. त्यातच स्मार्ट सिटीतूनही शहराला वगळल्याने महापालिकेचा आर्थिक गाडा चालविणे कठीण होणार आहे. मागील सर्वसाधारण सभेत उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगरसदस्यांनी केल्या होत्या. मात्र, उपाययोजना करण्यापेक्षा दौऱ्यांवरील खर्चाचे विषय स्थायी समितीत एकामागून एक मंजूर केले जात आहे. मात्र, त्यावर विरोधक काहीही बोलत नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील सर्वसाधारण सभेत महापौर शकुंतला धराडे यांचा स्पेन दौरा आणि पर्यावरण विभागाच्या सदस्यांच्या दौऱ्यांवर पंधरा लाखांचा विषय मंजूर करण्यात आला. त्यानंतर काल झालेल्या सभेत आयुक्त राजीव जाधव यांच्या चीन आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्याच्या विषयास मान्यता दिली आहे. शहरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्र शासन आणि जागतिक बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे अर्थसाहाय्य घेतले आहे. दुष्काळी परिस्थिती आणि महापालिकेचे उत्पन्न कमी होत असताना अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त होणाऱ्या स्पर्धांवर उधळपट्टी करणे योग्य आहे का? ही बाब लोकनेते असणाऱ्या पवार यांना रुचेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)