शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाकारलेल्या ‘ई पास’मध्ये पोलीस आयुक्त घालणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या १७ दिवसांत तब्बल १ लाख ११ हजार २४३ अधिक पुणेकरांनी ई-पाससाठी अर्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या १७ दिवसांत तब्बल १ लाख ११ हजार २४३ अधिक पुणेकरांनी ई-पाससाठी अर्ज केला आहे. त्यातील केवळ २८ हजार ६९८ जणांचे पास मंजूर करण्यात आले. निम्म्याहून अधिक अर्ज नाकारण्यात आले आहेत. याबाबत अनेक तक्रारी येत आहे. त्यामुळे नाकारलेल्या अथवा प्रलंबित असलेल्या ई-पासचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत एक ट्विट करून माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ई-पासबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपण ई-पाससाठी अर्ज केला असेल ज्यामध्ये प्रलंबित किंवा नाकारले स्थिती दर्शविली गेली असेल तर आपण या ट्विटर अंतर्गत तपशीलांसह माझ्या लक्षात आणून द्या. आम्ही अर्जाचे पुनरावलोकन करू.

अनेकदा काही किरकोळ चुका तसेच अत्यंत महत्त्वाचे काम असतानाही केवळ कोविड चाचणी प्रमाणपत्र न जोडल्याने अर्ज फेटाळण्यात येत आहेत. निम्म्याहून अधिक अर्ज फेटाळले गेले आहेत. अनेकांनी याबाबत तक्रारी केल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या अर्जांचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे.