शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कायदा सुधार समितीच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST

पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे विद्यापीठ कायद्यातील सुधारणेसाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक ...

पुणे : राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे विद्यापीठ कायद्यातील सुधारणेसाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कायद्यात कोणते बदल करावेत, ऑनलाईन परीक्षा संदर्भात कायद्यात कोणती तरतूद करावी, इतर विद्यापीठांमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा समावेश राज्याच्या शिक्षण क्षेत्रात कसा करावा, याबाबत समितीकडून अहवाल तयार करण्याचे काम केले जात आहे, असे समितीतील सदस्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विविध विद्यापीठांच्या आजी- माजी कुलगुरूंसह कायदे अभ्यासक आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांचा समावेश केला आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे या समितीचे सदस्य तर, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. विद्यापीठ कायद्यातील सुधारणांच्या दृष्टीने शिक्षक-शिक्षकेतर सेवक, विविध शैक्षणिक संघटना यांच्याकडून येत्या ४ डिसेंबरपर्यंत सूचना मागविल्या आहेत.

विद्यापीठ कायद्यात सुधारणा करताना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे यांचा विचार केला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये करता यावा, या दृष्टीनेही समितीकडून चाचपणी केली जाणार आहे.