शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येऊ

By admin | Updated: February 15, 2017 02:40 IST

प्रदूषणमुक्त स्वच्छ व सुंदर शहर, वाहतुकीच्या उत्तम सुविधा, महिला सुरक्षा, महिला व युवकांना रोजगार, शेवटच्या घटकाचा विचार करून

पुणे : प्रदूषणमुक्त स्वच्छ व सुंदर शहर, वाहतुकीच्या उत्तम सुविधा, महिला सुरक्षा, महिला व युवकांना रोजगार, शेवटच्या घटकाचा विचार करून शहराच्या विकासासाठी एक दिशा निश्चित केली जाईल. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष निवडणुकीनंतर मतभेद विसरून एकदिलाने काम करतील. त्याचबरोबर शहरातील विविध विषयांमधील तज्ज्ञांची विकासकामांमध्ये मदत घेतली जाईल, अशी ग्वाही प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि जनवाणी आयोजित ‘पुणे महापालिका निवडणूक २०१७’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे संघटक श्याम देशपांडे, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.योगेश गोगावले म्हणाले, ‘‘स्मार्ट पुणे उभे करताना सर्वांचा सहभाग आवश्यक असेल; मात्र प्रत्यक्षात सध्या त्याचा अभाव दिसून येत आहे. शहरविकासाच्या धोरणांमध्य शहरातीलत तज्ज्ञ व जनतेने सहभाग द्यावा. आगामी काळात देशाच्या पाठीवर आदर्श शहर म्हणून पुण्याची ओळख व्हावी.’’अभय छाजेड म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाने १९९७मध्ये आगामी २५ वर्षांचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवून नियोजन केले होते. शहरातील विविध पायाभूत सुविधांचा पाया काँग्रेसने घालून दिला आहे. यामध्ये २४ तास पाण्याची योजना, वाहतुकीसाठी मेट्रो व उड्डाणपूल, कचरा प्रक्रिया केंद्र, त्यापासून मिथेनॉलसारखे गॅस तयार करणे आदींचा समावेश आहे.’’हेमंत संभूस म्हणाले, ‘‘शहरविकासासाठी अनेक योजना व प्रकल्प आखले जातात; मात्र त्यांची अंमलबजावणी वेळेवर न झाल्याने खर्चाचा भुर्दंड शहरातील नागरिकांवर पडतो. कोणताही प्रकल्प राबवीत असताना शहरातील प्रत्येक नागरिक केंद्रबिंदू मानून करावा. शहराच्या भौगिलिक रचनेनुसार नियोजन केले जावे.’’श्याम देशपांडे म्हणाले, ‘‘शहराचा सर्वांगीण विकास करताना ‘पुणे सिटी डेव्हल्पमेंट कोड’ तयार करून त्यानुसार नियोजन केल्यास स्मार्ट शहर उभे करता येईल. वाहतूकव्यवस्था कोलमडली आहे. गरिबांना स्वत:च्या मालकीची घर मिळत नाही. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.’’(प्रतिनिधी)