शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीत कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:37 IST

\Sलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीत मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ५८ कुंटणखान्यांची झाडाझडती ...

\Sलोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीत मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ५८ कुंटणखान्यांची झाडाझडती घेऊन ४४ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांचे ओळखपत्र, वाहने आणि गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

पोलिस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनचा कलावधी संपल्यानंतर बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीत मोठ्या प्रमाणत गर्दी वाढली होती. यामध्ये सराईत गुन्हेगारांचाही समावेश होता. सराईत गुन्हेगारांच्या वावरामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्‍यता होती. सराईत गुन्हेगारांच्या वावरा बद्दल उपायुक्त डॉ. नारनवरे यांना माहिती मिळताच त्यांनी नाकाबंदी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानूसार महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचा वापर करुन सात ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ही नाकाबंदी बुधवार पेठेतील एंट्री व एक्‍झिट परिसरात केली गेली. यामुळे सणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या किंमती ऐवजावर डोळा असलेल्या गुन्हेगारांना चाप बसला. तर दुसरीकडे वेश्‍यावस्तील अल्पवयीन मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेतला जात असतो, याला प्रतिबंध घालण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, 25 पोलिस अंमलदार तसेच आरपीसी व सीआर मोबाईल प्रत्येकी एक सहभागी झाले होते. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कोहिनूर बिल्डींग, शांता बिल्डींग, नवीन सागर बिल्डींग, ताजमहल बिल्डींग आदी ठिकाणचे 58 कुंटणखाने तपासण्यात आले. तेथे सापडलेल्या 44 व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई केली गेली.

......

चौकट

नियमभंग करणा-या हॉटेल व्यवसायिकांवर कारवाई

परिमंडळ एकच्या हद्दीत नियमभंग करीत नियमित वेळेपेक्षा जास्त वेळा उघड्या असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. यामध्ये डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत 360 डिग्री, झेड ब्रिज जवळील चौपाटी, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल सुदामा यांच्यावर अटी व शर्थींचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

.....