शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खासगी इंग्रजी शाळांचा संपाचा इशारा

By admin | Updated: May 24, 2016 05:51 IST

शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरक्षित जागांवर प्रवेश दिले जात आहेत. मात्र शासनाकडून अनेक शाळांना २०१२ पासूनचा शुल्क

पुणे : शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरक्षित जागांवर प्रवेश दिले जात आहेत. मात्र शासनाकडून अनेक शाळांना २०१२ पासूनचा शुल्क परतावा मिळालेला नाही. यामुळे शाळांवर आर्थिक बोजा पडत आहे. याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने इंडिपेंडन्ड इंग्लिश स्कुल्स असोसिएशनने येत्या १५ जूनला शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांची घंटा १५ जूनला वाजणार नाही.शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार राज्यातील इंग्रजी शाळांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी २०१२ पासून पाळत आहेत. परंतु याच कायद्याप्रमाणे शासनाने वेळेवर फी परतावा करण्याची जबाबदारी शासन पूर्ण करताना दिसत नाही. तसेच या कायद्याच्या अनुशेषाने शासनाने सरकारी शाळांमध्ये केलेला प्रती विद्यार्थी खर्च किंवा खाजगी विनाअनिदानित शाळेची फी याप्रमाणे करावा परंतु तसे न करता सरकारी शाळेमधील शिक्षकांचा पगार हा प्रती विद्यार्थी संख्या या मध्ये विभागून फक्त तोच फी परतावा म्हणून दिला जातो. तो आजही अनेक खाजगी शाळांना मिळाला नाही. त्यामुळे संघटनेने १५ जुनला शाळा न उघडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जागृती धर्माधिकारी, भरत मलिक, राजेंद्र दायमा आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रश्नावर तोडगा काढाण्याची मागणीशिक्षण हक्क कायद्या नुसार शाळेमध्ये होणारा खर्च, इमारत, पाठ्यपुस्तक,गणवेश, शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार या सुविधांवर होणारा खर्च जोडुन योग्य असा प्रती विद्यार्थी खर्च व त्याला अनुसरूण शंभर टक्के फी परतावा देण्यात यावा. अन्यथा शाळांकडे खाजगी विनाअनुदानित शाळांकडे दुसरा पर्याय नसल्याने खाजगी शाळा व संस्था बंद पडतील म्हणुण ़शासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संघटनेच्या पुण्यात सुमारे २५० खासगी शाळा तर राज्यात राज्यात सुमारे ३२०० शाळा असल्याचा दावा संघटनेतर्फे करण्यात आला आहे.