शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका वाढला, विदर्भात पारा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST

पुणे : बंगालच्या उपसागरातील बुरेवी चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून ते सध्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या जवळ आहे. पूर्वेकडून ...

पुणे : बंगालच्या उपसागरातील बुरेवी चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून ते सध्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या जवळ आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर आता कमी होऊ लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात थंडीचे पुनरागमन होऊ लागले आहे. विदर्भातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी, दक्षिण केरळमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारीही तामिळनाडु, पाँडेचरी, दक्षिण केरळ, लक्ष्यद्वीप येथील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आता उत्तरेकडील वार्यांचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घसरले आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात किंचित घट झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ११.५, लोहगाव १३.२, जळगाव १२.६, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर १४.३, मालेगाव १३.६, नाशिक ११.१, सांगली १६, सातारा १३.३, सोलापूर १४.४, मुंबई २१.४, सांताक्रुझ १८.४, रत्नागिरी २०.६, पणजी २२.७, डहाणु १८.८, औरंगाबाद १३, परभणी १०.६, नांदेड १४, अकोला १३.१, अमरावती १४.४, बुलढाणा १४.२, चंद्रपूर १६, गोंदिया १०.५, नागपूर १२.४, वाशिम १२.८, वर्धा १३.४.

............

पुण्यात पारा घसरला

गेले काही दिवस सकाळी गारवा, दुपारी उकाडा व रात्री काही थंडी असे विचित्र वातावरणाचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना आता थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात पुण्यातील किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले होते. आता पुन्हा किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घटले आहे. दिवसाच्या तापमान अद्याप वाढलेले राहण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस रात्रीचे तापमान सरीसरीच्या जवळपास १२ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार आहे.